तरुणींनी स्वत:जवळ कट्यार ठेवावी, कुर्ला येथील कपल मारहाण घटनेनंतर जैन मुनी निलेशचंद्र संतप्त
कुर्ला येथील उद्यानात २० नोव्हेंबर रोजी एका कपलला सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच्या तीव्र प्रतिक्रीया सर्व स्तरातून उमटल्या आहेत.

कुर्ला येथील एका गार्डनमध्ये एका कपलला अवघ्या तेरा ते पंधरा वयाच्या टोळक्याने मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणात आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी आता हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. टिपू सुलतानचा नाही आता घरातील महिलांनी सोबत कट्यारी बाळगल्या पाहिजेत आणि आम्ही सकल हिंदू समाजाला घरोघरी तलवार वाटणार आहोत असे निलेशचंद्र मुनी यांनी म्हटले आहे.
कुर्ला येथील उद्यानात बसलेल्या एका कपलला सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याच्या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच्या तीव्र प्रतिक्रीया सर्व स्तरातून उमटल्या आहेत. मुंबई अशा प्रकारची घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता या प्रकरणात राजकीय प्रतिक्रीया देखील उमटू लागल्या आहेत. जैन मुनी निलेशचंद्र मुनी यांनी हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. त्या टिपू सुलतानचा नाही. आधी माझगावच्या राजावर अंडी फेकली. आता कुर्ला येथे असा तेरा ते चौदा वर्षांची मुलांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता सकल हिंदू समाजातील महिला आम्ही तलवार आणि कट्यारीची वाटप करणार आहोत असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की हे लहान हिरवे साप आहेत.. साप मोठा असो वा छोटा तो विषारी असतो. त्यांना वेळेतच ठेचणेच योग्य असते. आता आम्ही सकल हिंदू समाजातील महिलांना तलवारीचे वाटप करणार आहोत. तसेच प्रत्येक महिलेने स्वत: जवळ कट्यार बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते.
कुर्ला प्रमोद महाजन उद्यानात नेमके काय झाले
मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील असलेल्या स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात २० नोव्हेंबर रोजी एका अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका कपलला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.हे कपल उद्यानात असताना १२ ते १५ वयोगटातील सुमारे ८ ते १० अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्यांना घेरून शिवीगाळ आणि अभद्र वर्तन केले. तरुणाने आणि तरुणीने विरोध केल्यावर टोळक्याने लाठ्या-काठ्या तसेच हॉकी स्टिक आणि लाथा-बुक्क्यांनी त्यांना मारहाण करत त्यांना उद्यानाबाहेर ढकलले आहे.