AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाकडे उमेदवार नाहीच, भाजपच्या व्यक्तीलाच उमेदवारी देणार

Lok Sabha Election Maharashtra Politics: जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण? याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी जळगाव लोकसभेतून उमेदवारीसाठी अनेक नावांवर चर्चा झाली.

ठाकरे गटाकडे उमेदवार नाहीच, भाजपच्या व्यक्तीलाच उमेदवारी देणार
uddhav thackeray
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 01, 2024 | 3:16 PM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतु महायुती किंवा महाविकास आघाडीतील सर्व सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जळगाव लोकसभा मतदारसं उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे. जळगाव जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या दोन जणांच्या नावावर चर्चा झाली. त्यातील एक नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपमध्ये असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार, भाजप विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या दोघांच्या नावावर चर्चा झाली. या बैठकीत पारोळा येथील भाजपचे करण पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

या नावांवर चर्चा

जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण? याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी जळगाव लोकसभेतून उमेदवारीसाठी हर्षल माने, कुलभूषण पाटील, ललिता पाटील यांच्या नावांसह भाजपचे खासदार उन्मेष पाटील, उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, करण पवार यांचीही नावे चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, डॉ. उत्तमराव महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

करण पवार यांच्याकडून दुजोरा

भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील तर दुसरीकडे भाजपचे करण पवार या दोघांची नावे जळगाव लोकसभेसाठी आघाडीवर आहे. परंतु बैठकीत करण पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत करण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा दुसरा दिला आहे. नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी फोनवरून बोलताना दिली आहे. त्यामुळे आता आता ठाकरे गटाचा उमेदवार कोण हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

कोण आहेत करण पवार

करण पवार हे पारोळा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. करण पवार हे मुळचे पारोळा तालुक्यातील आहेत. त्यांना राजकीय वारसा मोठा आहे. त्यांचे वडिल पूर्वी जि.प. सदस्य होते तर आजोबा आमदार होते. त्यांचे काका डॉ. सतीश पाटील राष्ट्रवादीचे आमदार होते.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...