AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अंदर बाहर’ गेमचा नाद नडला, शासकीय कॉन्ट्रॅक्टरला लाखोंचा गंडा, जळगावात नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका शासकीय ठेकेदाराची ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ७८ लाख ९० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. "अंदर बाहर" या ऑनलाइन गेमच्या आमिषाने दोन अज्ञात आरोपींनी त्यांची फसवणूक केली.

'अंदर बाहर' गेमचा नाद नडला, शासकीय कॉन्ट्रॅक्टरला लाखोंचा गंडा, जळगावात नेमकं काय घडलं?
jalgaon crime
| Updated on: Jan 21, 2025 | 6:31 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता जळगावात एका शासकीय ठेकेदाराची 78 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ऑनलाईन गेम खेळा आणि भरघोस कमाई करा, असे अमिष दाखवत त्या कॉन्ट्रक्टरला गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगावातील पाचोरा जिल्ह्यातील कॉन्ट्रक्टरला ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात गंडा लागला आहे. ऑनलाईन गेम खेळून भरघोस कमाई करा, असे आमिष दाखवत रोशन पद्मसिंग पाटील (२७) यांची तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपयांची ऑनलाईनरित्या फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान घडला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

रोशन पाटील यांना ३ नोव्हेंबरला दोन जणांनी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. यावेळी त्यांनी एका वेबसाईटवर ‘अंदर बाहर’ आणि ‘अंदर बाहर २’ हे गेम खेळल्यास मोठ्या प्रमाणात पैसे जिंकू शकता, असे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून रोशन पाटील यांनी तो गेम खेळण्यास सुरुवात केली.

यानंतर त्या दोन भामट्यांनी रोशन पाटील यांना तुम्ही हा गेम जिंकला आहेत, असे भासवले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये जमा केले. यामुळे रोशन पाटील यांचा विश्वास बसला. यानंतर ते वेळोवेळी हा ऑनलाईन गेम खेळत गेले. यावेळी त्यांनी नेटबँकिंगद्वारे एकूण ७८ लाख ९० हजार ५०० रुपये यात गुंतवले. पण काही दिवसांनी ही रक्कम परत आलीच नाही. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसे मिळणे दूरच, उलट गुंतविलेली रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे रोशन पाटील यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी त्यांनी साधणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना