AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती एक्सप्रेसला धान्याने भरलेल्या ट्रकची धडक, रेल्वे वाहतूक विस्कळीत

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे अमरावती एक्सप्रेसला धान्याने भरलेल्या ट्रकची धडक झाली. ट्रक चालक रेल्वे गेट तोडून ट्रक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला.

अमरावती एक्सप्रेसला धान्याने भरलेल्या ट्रकची धडक, रेल्वे वाहतूक विस्कळीत
jalgaon train accident
| Updated on: Mar 14, 2025 | 1:55 PM
Share

जळगावातील बोदवडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सहून अमरावतीकडे निघालेल्या अमरावती एक्सप्रेसला धान्याने भरलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्या ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्ण चुराडा झाला. सुदैवाने रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पहाटे ४.३० च्या सुमारास अमरावती एक्सप्रेस (१२१११) ही गाडी बोदवड रेल्वे स्थानकाजवळ आली. यावेळी एक ट्रक चालकाने रेल्वे गेट तोडून ट्रक ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक अमरावती एक्सप्रेस आली आणि हा ट्रक थेट एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातानंतर ट्रक चालक ट्रक जागेवरच सोडून फरार झाला.

बोदवड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक सध्या बंद आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे. मात्र या नवीन पुलाबद्दल स्थानिकांमध्ये जनजागृती झालेली नाही. शुक्रवारी सकाळी गहू भरलेल्या ट्रकच्या ट्रक चालकाने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी हा अपघात घडला.

मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसला धान्याचा ट्रक धडकल्याची ही घटना सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण रेल्वे यंत्रणा मात्र ही विस्कळीत झाली. अनेक प्रवाशांना रेल्वे उशिरा असल्याने त्रासाचा सामना करावा लागत आहे. या अपघातामुळे नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस ,सुरत पॅसेंजर ,हावडा मेल ,पुरी सुपरफास्ट ,एक्सप्रेस शालिमार एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या जवळपास दोन ते तीन घंटा उशिराने असून प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे

अनेक गाड्या उशीराने

जळगावात झालेल्या या रेल्वे अपघातामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही सकाळी चार वाजता वरणगाव येथे थांबवण्यात आली. तर 4:30 वाजताची शालीमार एक्सप्रेस ही अजूनही भुसावळ येथे थांबली आहे. नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस सहा वाजताची ही तीन तासापासून जळगाव रेल्वे स्थानक येथे थांबली आहे. त्यासोबतच सकाळी तीन वाजताची प्रेरणा एक्सप्रेस अजूनही बोदवडच्या जवळ थांबली आहे. सकाळची चार वाजताची हावडा मेल वरणगाव येथे थांबली आहे. या अपघातामुळे मुंबई नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे

मोठा अनर्थ टळला

या अपघातानंतर तीन ते चार तासांनी रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने धान्याने भरलेला ट्रक रेल्वे रुळावरून हटवला आहे. तसेच रेल्वे रुळावर पडलेले धान्यही हटवण्यात आले आहे. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच रेल्वे स्थानक जवळ असल्याने आणि रेल्वे धीमी झाली होती मोठा अनर्थ टळला, अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.