अभिनेत्री सायली पाटील हिने घेतले अमळनेर मंगळग्रह मंदिराचे दर्शन, मंदिर संस्थानचा परिसर पाहून सायली भारावली

अभिनेत्री सायली पाटील यांचे दोडाईचा हे मामाचे गाव आहे. मामाच्या गावी जाताना गुरुवारी अभिनेत्री सायली पाटील हिने श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली.

अभिनेत्री सायली पाटील हिने घेतले अमळनेर मंगळग्रह मंदिराचे दर्शन, मंदिर संस्थानचा परिसर पाहून सायली भारावली
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 8:03 PM

जळगाव : देशात दुर्मीळ असेलल्या मंगळग्रहाच्या मंदिरापैकी एक जळगावातील अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर आहे. घर बंदूक बिरयानी या चित्रपटातील अभिनेत्री सायली पाटील हिने या मंदिराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी सायली हिने संपूर्ण मंदिर पसिरात फेरफटका मारुन मंदिर संस्थानची कामकाजाची तसेच विविध ठिकाणाची माहिती जाणून घेतली. मंगळग्रह मंदिर आणि येथील सोयी-सुविधा, नैसर्गिक वातावरण पाहून सायली भारावली होती.

अभिनेत्री सायली पाटील यांचे दोडाईचा हे मामाचे गाव आहे. मामाच्या गावी जाताना गुरुवारी अभिनेत्री सायली पाटील हिने श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली. यावेळी सायली पाटील हिच्यासोबत तिचे वडील नरेंद्र पाटील, आई सुनीता पाटील, मामा डॉ. जितेंद्र देसले हे सुध्दा होते.

या परिवारासोबत सायली हिने मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीष कुलकर्णी, हेमंत गुजराती, पुषंध ढाके, मनोहर तायडे यांच्या हस्ते सायली पाटील यांचा सत्कार झाला. सायली यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत झुंड, घर बंदूक आणि बिर्याणी यासोबतच असं माहेर सुरेखबाई या मालिकेत भूमिका साकारलेली आहे.

हे सुद्धा वाचा

सुशोभीकरणामुळे मन:शांती लाभली

यावेळी बोलताना अभिनेत्री सायली पाटील म्हणाल्या की, दोडाईचा येथे मामाच्या गावी आली होती. त्यामुळे अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात येण्याचा योग आला. आजवर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी व्यावसायिकपणा दिसून आला. व्यावसायिकपणामुळे भाविक मंदिरापासून दूर जाऊ लागला आहे.

मंगळग्रह मंदिरात येण्यापूर्वी वाटलं होतं की व्यावसायपणा असेल. मात्र कुठेही याठिकाणी व्यावसायिकपणा दिसला नाही. ही बाब खरच कौतुकास्पद आहे. मंदिराकडून भाविकांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, नैसर्गिक वातावरण तसेच मंदिर परिसरात केलेले सुशोभीकरणामुळे मन शांती लाभली असेही त्या म्हणाल्या.

माझ्या आजोळमध्ये देशातील एकमेव मंगळग्रह मंदिर आहे. याची माहिती मला यापूर्वी मिळाली असती तर मी नक्की भेट दिली असती. भविष्यात चित्रपट किंवा मालिकेत मंगळग्रह मंदिर दाखवण्यासाठी नक्की प्रयत्न करीन, असेही अभिनेत्री सायली पाटील यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.