
किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : जळगावात जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. या सभेला उपस्थित सभासद अन् अध्यक्ष यांच्यात वाद होवून शाब्दिक शिवीगाळ आणि खडाजंगी झाली. सभासदांना लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध करून दिला नाही, तसेच आक्षेप घेऊन त्यानंतरही ठराव मंजूर केले जात असल्याने या कारणावरून सभासदांनी संताप व्यक करत गोंधळ घातला. जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातील सभागृहात पार पडली ग. स. सोसायटीची 118 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत गोंधळ उडाल्याने अध्यक्षांनी सर्व ठरावांना मंजुरी देत १५ मिनिटात सभा गुंडाळली.
आशिया खंडातील सर्वात मोठी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीची सर्वसाधारण सभा रविवारी जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली. लेखी पत्र देऊनही ग स सोसायटीचा लेखापरीक्षण अहवाल सभासदांना उपलब्ध करून देण्यात आला नाही, तसेच या सभेत आक्षेप घेतल्यानंतरही ठराव मंजूर केले जात असल्याने उपस्थित सभासदांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला.
सभेत गोंधळ होऊन काही सभासद आणि अध्यक्ष यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन प्रचंड खडाजंगी उडाली. त्यानंतर एका सभासदाने ग. स. सोसायटी तुमच्या बापाची जहागिरी? असा सवाल केल्यानंतर आठ ते दहा सभासदांनी अध्यक्षांना उत्तर देण्याची मागणी केली. त्यानंतर गोंधळ उडून अध्यक्षांनी सर्व ठरावांना मंजुरी देत 15 मिनिटात सभा गंडाळली.
सोसायटीची सभा गोंधळातच आटोपल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी सभासद गणेश देशमुख, विक्रम सोनवणे, आर. के. पाटील यांच्यासह सभासदांनी केली. तसेच सभासदांना अध्यक्षांकडून धमकावल्या जात असल्याचा आरोप गणेश देशमुख यांनी केला. सभासदाने मागितलेली माहिती लेखी स्वरुपात दिलेली आहे. तसेच त्यांचे समाधान होत नसेल तर संस्थेत येऊन अहवाल दाखविण्यात येईल, असे सांगितले. मात्र, सभासदाचे समाधान होत नसेल तर काय करणार अशी प्रतिक्रिया ग. स. अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली.