
खानदेशात सध्या कोल्डवॉर सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील सुरी-भोपळ्याचे युद्ध सुरू आहे. खडसे हे महाजनांविरोधात आक्रमक झाले आहेत. आठवडाभरापासून महाजन हे खडसेंच्या टार्गेटवर आहेत. आता त्यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. माझ्या सख्ख्या भाच्याला मंत्री गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाहक 7 वर्षे तुरूंगात काढावी लागली
मंत्री गिरीश महाजन यांच्या सारख्यानी आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचेवर केल्याने खळबळ उडाली आहे. कुरुंदकर याच्या सोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्या आले, त्याला सात वर्ष विनाकारण कारागृहात काढावे लागले, निर्दोष सुटून आल्याच्या नंतर त्याने कारागृहाच्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जात असल्याचं आपल्याला सांगितले, अस खडसे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेत आवाज उठवणार
कारागृह साहित्य पुरवठा प्रकारात ही पाचशे रुपये घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. यामध्ये ठेकेदाला जळगाव मधील एका मंत्राची साथ असल्याचं ही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी यांनी केलेल्या या आरोपाच्या बाबत आरोपाच्या बाबत आपण माहिती घेत असून, नंतर या बाबत आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचं आणि या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्री पदावरून निशाणा
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केली आहे पालकमंत्री पदाची आवश्यकता नसेल सर्व ठिकाणचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतले पाहिजे. पालकमंत्री पदासाठी मी मागे सुद्धा म्हटलं होतं की का म्हणून लोचटपणा आणि लाचारी करावी. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी ऐकून सहा सहा महिने पालकमंत्री नियुक्त करू नये. त्या जिल्ह्यात चार चार मंत्री असताना बाहेरच्या जिल्ह्यातल्या मंत्राने मला पालकमंत्री करा असा आग्रह धरणं म्हणजे काहीतरी स्वार्थ आहे हजारो कोटी रुपयांचं बजेट कुंभमेळाचा आहे. कुंभमेळ्याच्या बजेट मधला काहीतरी मलिदा मला मिळावा, म्हणून पालकमंत्री करा असा काहींचा आग्रह आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसे यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.