
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे या दोन खानदेशातील नेत्यांचे विळा-भोपळ्याचे वैर सर्वांनाच माहिती आहे. खडसे भाजपमधून साईडलाईन झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तर गेल्या वर्षी त्यांनी भाजपच्या दिल्ली नेतृत्वाशी गाठीभेटी घेतल्या होत्या. माशी कुठं शिंकली ते कळलं नाही पण भाजपत पुनरागमनाच्या खडसेंच्या चर्चांना विराम मिळाला. खडसे आणि महाजन एकमेकांना संधी मिळेल तसे डिवचतात. आता महाजन यांनी पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधला आहे.
खडसेंचा राग नाही कीव येते
हनी ट्रॅपचा संदर्भ देत, झाली ना त्याच्यावर कारवाई, एवढ्या कारवाया झाल्या, आता मी ऐकत होतो दोन-तीन गुन्हे कशावर असा वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल कोणी महिलांनी तक्रार दिली असेल तर गुन्हे दाखल होईल तुम्हाला काय एवढं पोटसूळ उठलं आहे, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला. तुम्ही बोलणार नाहीये कारण त्यांचा मानसिक संतुलन खरंच बिघडलेला आहे आता मी त्यांची मुलाखत बघत होतो मोबाईलवर कोणीतरी मला दाखवली ती खरंच मला त्याची कीव येत आहे. म्हणजे मला राग येत नाही खडसेंचा पण कीव येते, असे वक्तव्य महाजनांनी केले.
मग दिल्लीत जाऊन पाया पडतात
आता हे म्हणतात मी काय केलं? तुमचे ते भोसरी प्रकरण माहिती आहे. तुम्ही चोऱ्यामाऱ्या करता. डाके टाकता आणि वर दिल्लीत जाऊन अक्षरशः आडवे पडून पायावर पडतात. आमच्या नेत्यांच्या आणि त्यांच्याकडून इथे सूट मिळवून देत आहे. म्हणून सगळ्या प्रकार चाललेला आहे. माफ करा माफ करा माफ करा हा धंदा त्यांचा चाललेला आहे, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला. ते वायफळ बडबड करतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना इतके असह्य झालेले बघवत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मी फार बोलणार नाही, असे महाजन म्हणाले.
विरोधकांना जनाधार उरलेला नाही
मला वाटतं विरोधी पक्षांच्या मागे जनाधार राहिलेला नाही, असा टोला महाजनांनी लगावला. त्यांना कोणी लोक मतदान करायला तयार नाही. एवढ्या मोठ्या बहुसंख्येने लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने झपाट्याने पुढे जात आहोत आणि त्यामुळे यांना सांगायला काहीच राहिलेले नाही. अडीच वर्षाच्या कार्यकाळात यांनी काहीच बोंब पाडलेली नाही आणि म्हणून आता सरकारला बदनाम कसं करायचं तर यांच्याकडे हा एकच विषय आहे, अशी टीका त्यांनी केली.
विनाकारण सगळ्यांनाच बदनाम करायचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. तुमच्याकडे काय पुरावा आहे? कुठले स्कँडल चाललय, काय चाललय तुम्ही आणा समोर ठेवलं पाहिजे. मला समजत नाही विधानसभेत यायचं तिथे काही दाखवायचं. त्यापेक्षा त्याचे पुरावे अध्यक्षांकडे द्या. लोकही त्यांना या अशा गोष्टींना कंटाळल्या त्यामुळे काही असेल तर चालल्या चार गोष्टी करा राज्याच्या हिताच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी करा लोकांच्या हिताच्या गोष्टी करा ते दिलं सोडून आणि सकाळपासून फालतू बडबड करायची, असा टोला महाजनांनी विरोधकांना लगावला.