जळगावच्या तरुणाची कमाल, विकसीत केले फेसबुकच्या तोडीचे देशी अ‍ॅप; ‘इंडियाबुक’ला तरुणांची पसंती

| Updated on: Jun 16, 2022 | 2:51 PM

फेसबुकसारखे एखादे देशी अ‍ॅप असावे या विचाराने प्रेरित होऊन, जळगावच्या तरुणाने इंडिया बुक नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप अल्पवधीतच प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.

जळगावच्या तरुणाची कमाल, विकसीत केले फेसबुकच्या तोडीचे देशी अ‍ॅप; इंडियाबुकला तरुणांची पसंती
Follow us on

जळगाव : सध्या सर्वत्र सोशल मीडियाचा (Social media) बोलबाला आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या सर्वाधिक वापर हा व्हॉट्सअप, फेसबुक (Facebook), ट्विटर, इंस्टाग्राम या सारख्या अ‍ॅपचा केला जातो. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला जगभरातील लोकांच्या संपर्कात राहाता येते. फेसबुक हे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संवादाचं सर्वात लोकप्रिय साधन आहे. कोट्यावधी लोक फेसबुकचा वापर करतात. मात्र हे सर्व अ‍ॅप्स विदेशी आहेत. भारताचे देखील फेसबुकसारखे एखादे अ‍ॅप असावे या विचारातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या तरुणाने “इंडियाबुक”(Indiabook) नावाचे देशी अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप फेसबुकच्या तोडीसतोड असेच आहे. लक्ष्मीकांत सोनार असे या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने “इंडियाबुक” नावाचे अ‍ॅप तयार केले असून, हे अ‍ॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरवरून डाऊनलोड करता येईल. अवघ्या तीन दिवसांमध्ये 18 हजारांहून अधिक जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

इंडियाबुकचं वैशिष्टं

इंडियाबुक हे अ‍ॅप फेसबुकच्या तोडीस तोड असे अ‍ॅप आहे. विशेष म्हणजे हे भारतात तयार करण्यात आलेले अ‍ॅप आहे. तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबूक प्रमाणेच लाईव्ह कॉल, शेअरिंग, चॅटिंग, कमेंटस आणि आपले विचार मांडू शकता. विविध विषयांवर पोस्ट करू शकता. फेसबूकमध्ये मित्र अ‍ॅड करण्याची मर्यादा ही केवळ पाच हजार इतकीच आहे. तर या अ‍ॅपमध्ये मित्र संख्या दहा हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अ‍ॅप हॅक होणे त्याचा गौरवापर होणे या प्रकाराला आळा बसावा यासाठी तांत्रिक दृष्यादेखील हे अ‍ॅप अंत्यत सुरक्षीत बनवण्यात आले आहे. निगेटिव्ह असणाऱ्या पोस्ट रिपोर्ट करताच आपोआप डिलिट होणार आहेत. विशेष म्हणजे या अ‍ॅपची साईज अत्यंत कमी आहे, त्यामुळे हे अ‍ॅप मोबाईमध्ये सहज वापरता येते. मोबाईलची जास्त स्पेस घेत नाही.

हे सुद्धा वाचा

कोणते प्लॅटफॉर्म उपलब्ध?

इंडिया बुक या अ‍ॅपवर बिझनेस, जाहिरात, गेम्स, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ, मायक्रो ब्लॉगिंक सुविधा आणि मेसेजिंग इत्यादी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तुम्ही या अ‍ॅपचा उपयोग करून चॅटिंग करू शकता. मायक्रो ब्लॉगिंक साईटच्या माध्यमातून विविध विषयांवर व्यक्त होऊ शकता. सोबतच जाहिरात देखील करू शकता. अल्पवधितच इंडियाबुक तरुणांमध्ये लोकप्रिय झाले असून, गेल्या महिनाभरता तब्बल 18 हजारांहून अधिक जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबूकला एक नवा पर्याय उपलब्ध झाला असे म्हणाता येईल.