Jalgaon : इकडे बिबट्या तिकडे तुफ्फान पूर, लताबाईंनी झेप घेतली, पुढचे 16 तास…. जळगावचा थरार अंगावर शहारे आणणारा

Jalgaon News : चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे लताबाई कोळी नावाच्या महिलेसोबत थरराक घटना घडली. शेतात सेंगा तोडायला लताबाई गेल्या. साधारण अकरा वाजले होते. एक कुत्रा त्यांच्या दिशेने धावत येताना दिसला आणि त्याच्या मागे बिबट्या शिकार करण्यासाठी पळत होता.

Jalgaon : इकडे बिबट्या तिकडे तुफ्फान पूर, लताबाईंनी झेप घेतली, पुढचे 16 तास.... जळगावचा थरार अंगावर शहारे आणणारा
थरारक घटना...
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 9:57 AM

जळगाव : लताबाई (Latabai Koli) नावाच्या महिलेनं 16 तास सलग पाण्याच्या प्रवाहात मृत्यूशी झुंज दिली. आश्चर्यकारकरीत्या ही महिला बचावली आहे. केळ्याच्या खांबाचा आधार घेत या महिलेनं स्वतःचा जीव वाचवला. ही थरारक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा (Chopda) तालुक्यात घडली. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय या महिलेला आला. सलग 16 तासांची मृत्यूशी झुंज, पाण्याच्या प्रवाहात 60 किलोमीटर वाहून जाणं आणि त्यानंतरही सुखरुप जिवंत घरी परतणं, हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. बचावलेल्या महिलेनं टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना हा थराराक घटनाक्रम सांगितलाय.

बिबट्याचा हल्ला, नदीत उडी!

चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे लताबाई कोळी नावाच्या महिलेसोबत थरराक घटना घडली. शेतात शेगा तोडायला लताबाई गेल्या. साधारण अकरा वाजले होते. एक कुत्रा त्यांच्या दिशेने धावत येताना दिसला आणि त्याच्या मागे बिबट्या शिकार करण्यासाठी पळत होता. हे दृश्य पाहून लताबाई घाबरल्या.

बिबट्या आपल्यालाही खाऊन टाकेल, हल्ला करेल, या भीतीने लताबाईंनी थेट तापी नदीत उडी मारली. तापी नदीला पूर आला होता. लताबाईंना पोहता येत असल्यानं त्यांनी पोहण्यास सुरुवात केली. पुराच्या पाण्यात पोहणं सोपं नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं. पण इतक्यात त्यांना केळीचं खोड वाहताना दिसलं.

16 तासांत 60 किमी अंतर वाहून..

लताबाईंना केळीच्या खोडाने आधार दिला. चोपडा तालुक्यातून वाहत वाहत लताबाई सोळा तास 60 किलोमीटर अंतर अंमळनेर तालुक्यात आल्या. तिथे काठावर आल्यानंतर स्थानिक लोकांना लताबाईंना दवाखान्यात नेलं. नंतर लताबाईंच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. मग लताबाई सुखरुप घरी परतल्या.

लताबाई घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लताबाईंचं औक्षण करुन स्वागत करण्यात आलं. देवाच्या कृपेने त्या घरी परतल्या, अशी भावना त्यांच्या नातेवाईंकानी व्यक्त केली आहे. आपले जीव वाचवल्याबद्दल खुद्द लताबाई यांनीही देवाचे आभार मानले आहेत. हा घटनाक्रम ऐकताना, काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय लताबाईंच्या कुटुंबीयाना आला.