मंदाकिनी खडसेंसह 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिस ठाण्यात केली तक्रार दाखल, जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण तापले

| Updated on: Aug 03, 2022 | 10:07 AM

जळगावात एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांचा संघर्ष काही नवा नाहीयं. भाजपात असताना देखील एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्यात सर्वकाही अलबेल कधीच नव्हते. गिरीष महाजन यांना देवेंद्र फडणवीस यांचा फुल्ल सपोर्ट कायमच राहिला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस दाखल झाले.

मंदाकिनी खडसेंसह 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिस ठाण्यात केली तक्रार दाखल, जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण तापले
Follow us on

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाचे राजकारण चांगलेच तापलेले दिसतंय. आता हे सर्व प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेल्याने चिघळण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीयं. यावर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) नेमके काय भाष्य करतात हे बघण्यासारखेच ठरणार आहे. मात्र, यासर्व प्रकरणामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्कीच. गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात (Police) लेखी तक्रार दाखल केलीयं.

जळगावात एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांचा संघर्ष सुरूच

जळगावात एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांचा संघर्ष काही नवा नाहीयं. भाजपात असताना देखील एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्यात सर्वकाही अलबेल कधीच नव्हते. गिरीष महाजन यांना देवेंद्र फडणवीस यांचा फुल्ल सपोर्ट कायमच राहिला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. भाजपासोडून जाताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, अजूनही खडसे आणि महाजन यांच्यातील संघर्ष थांबलेला दिसत नाहीयं.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली

गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केलीयं. मंदाकिनी खडसेंसह इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेत थेट पोलिस ठाणेच गाठले. विशेष म्हणजे तक्रार दाखल करणारे अरविंद देशमुख हे गिरीश महाजन गटाचे समर्थक आहेत. आता यावर परत एकदा जळगाव जिल्हात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होणार हे नक्की आहे.