AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Drugs Seized : दिल्लीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, 130 कोटींचे हेरॉईन जप्त

अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलीस सतत ड्रग्ज तस्करांविरोधात मोहिमा राबवत आहेत. या मोहिमेअंतर्गत या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Delhi Drugs Seized : दिल्लीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, 130 कोटींचे हेरॉईन जप्त
Image Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 29, 2022 | 10:40 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थांची तस्करी (Smuggling) करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश (Gang Busted) केला आहे. या टोळीकडून संपूर्ण भारतातील कारवाईत पोलिसांनी 130 कोटी रुपयांचे 21,400 किलो सुपर क्वालिटी हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एका अफगाण नागरिकाचा समावेश आहे. परवेझ आलम, शमी कुमार उर्फ ​​शमी, रजत गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आतापर्यंतचे पोलिसांचे हे सर्वात मोठे यश असल्याचे डीसीपी क्राइम ब्रँच केपीएस मल्होत्रा ​​यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान, परवेझ आलम, शमी कुमार उर्फ ​​शमी, रजत गुप्ता आणि एका अफगाण नागरिक या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 21,400 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन आणि 26.53 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलीस सतत ड्रग्ज तस्करांविरोधात मोहिमा राबवत आहेत. या मोहिमेअंतर्गत या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोपींपैकी एकाचा यापूर्वीही एनडीपीएस कायद्यात सहभाग होता. आरोपी परवेज आलम हा हेरॉईन बनवण्यात तरबेज असून ड्रग्ज सिंडिकेटमधील डॉक्टर म्हणून त्याची ओळख आहे, असे डीसीपी मल्होत्रा यांनी सांगितले. (International drug smuggling busted in Delhi, heroin worth 130 crore seized)

Follow Us
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल