“संभाजीनगरमधील मविआच्या सभेची परवानगी हा प्रशासकीय भाग”; या मंत्र्याने स्पष्टच सांगितले…

| Updated on: Apr 01, 2023 | 7:36 PM

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची परवानगी हा प्रशासकीय भाग असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसेल तर सभेला परवानगी देण्यात येणार आहे.

संभाजीनगरमधील मविआच्या सभेची परवानगी हा प्रशासकीय भाग; या मंत्र्याने स्पष्टच सांगितले...
Follow us on

जळगाव : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसापूर्वी राडा झाल्यानंतर राजकीय चर्चेना उधान आले आहे. त्यातच उद्या महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्यामुळे त्या सभेच्या परवानगीवरून आता पुन्हा एकदा राजकीय चर्चा होऊ लागली आहे. त्यावरच आता मंत्री गिरीश महाजन यांनी या सभेच्या परवानगीवरून स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती काय आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार किंवा नाही हा प्रशासनाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्यामुळे आता परवानगीचा हा विषय राजकारणाचा झाला नसून तो भाग प्रशासनाचा असल्याचे सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यी उद्या संभाजीनगरमध्ये सभा होत आहे, तर दोन दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून सभेला परवानगी मिळणार की नाही ही चर्चाही जोरदारपणे होऊ लागली आहे.

त्यामुळे गिरीश महाजन यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर प्रश्न येणार नसेल तर पोलिसांच्यावतीने परवानगी देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे.

उद्याच्या सभेविषयी बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, प्रशासनाला आवश्यक व सुरक्षा दृष्टिकोनातून योग्य वाटत असेल तर परवानगी देतील मात्र सभेमुळे काही प्रश्न निर्माण होतील तर परवानगी मिळणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की,उद्या उद्धव ठाकरे यांची सभा होत असली तरी त्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची परवानगी हा प्रशासकीय भाग असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसेल तर सभेला परवानगी देण्यात येणार आहे.

मात्र या सभेमुळे काही प्रश्न निर्माण होणार असतील तर कदाचित प्रशासन परवानगी देणार नाही असंही मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.