दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत घोटाळा, थेट 16 कर्मचारी निलंबित

प्रमाणपत्र नसताना पण दिव्यांग म्हणून कर्मचाऱ्यांना लाभ दिले गेले असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार. कर्मचाऱ्यांनी 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दाखवून नोकरीचा लाभ घेतल्याची माहिती समोर.

दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत घोटाळा, थेट 16 कर्मचारी निलंबित
Divyang
| Updated on: Jan 29, 2026 | 5:22 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी : जळगावात दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत तफावत आढळल्याने आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आता कर्मचाऱ्याची आधी खात्यांतर्गत चौकशी त्यानंतर थेट बडतर्फ अथवा इतर शिक्षात्मक कारवाई केली जाणार असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेत नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे.

प्रमाणपत्र नसताना पण दिव्यांग म्हणून कर्मचाऱ्यांना लाभ दिले गेले असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार. कर्मचाऱ्यांनी 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दाखवून नोकरीचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीत प्रत्यक्षात केवळ 3 ते 4 टक्के एवढेच दिव्यांगत्व असल्याची माहिती समोर आली आहे.

कुठल्या विभागातील कर्मचारी निलंबित?

जास्त दिव्यांगत्व दाखवणारे प्रमाणपत्र कुठे आणि कसे तयार केले याची देखील तपासणी केली जाणार. त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार. आतापर्यंत निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, लेखा विभाग तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.