“भाजप-शिवसेनेचे मतभेद उघड”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं ‘त्या’ मतभेदाचं कारण सांगितलं…

| Updated on: Jun 10, 2023 | 6:51 PM

भाजप हाय कमांडकडून शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना बाजूला करून हटवले पाहिजे अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली असल्याचा संदर्भ त्यांनी दिला आहे.

भाजप-शिवसेनेचे मतभेद उघड; राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्या मतभेदाचं कारण सांगितलं...
Follow us on

मुक्ताईनगर : राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादीसग अनेक राजकीय पक्षातील विविघ घटना घडत असल्याने राज्यातील राजकीय गणित नेमकी कशी असणार याकडेच साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून राजकीय गोंधळ माजलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिवसेना आणइ भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर ठपका ठेवत असतानाच त्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या मतभेदावरूनही त्यांनी भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी त्यांच्यातील मतभेद आता उघडकीस असल्याचेही त्यांनी सांगितेल.

आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, अलिकडच्या कालखंडात भाजप-शिवसेनेचे मतभेद उघडीस येत आहेत. त्यावरूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

अगदी कल्याणचा विषय जर पाहिला तर श्रीकांत शिंदे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कल्याण बहिष्कार टाकल्याची घोषणा केली असल्याचे सांगत त्यांनी आता भाजप आणि शिवसेनेचे जमत नसल्याचे आणि फूट पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप हाय कमांडकडून शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना बाजूला करून हटवले पाहिजे अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली असल्याचा संदर्भ त्यांनी दिला आहे. तसेच भाजपच्या हाय कमांडकडून शिंदे गटातील निष्क्रिय मंत्र्याना हटवण्याचा विचार भाजपवाले करत असल्याचेही त्यांनी विश्वासाने सांगितले.

या निष्क्रिय मंत्र्यांमध्य आपल्या जळगावच्या मंत्र्याचाही सहभाग असल्याचे सांगत त्यांनी गुलाबराव पाटील यांचाही त्यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, गुलाबराव पाटील यांच्यावरही ठपका ठेवण्यात आल्याचे दिसत असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुठलेही कामे झालेले नाही.

तसेच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यामध्ये झाला असून या सगळ्या प्रकरणाचा ठपका त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर ठेवला आहे. तसेच गुलाबराव पाटील हे निष्क्रिय आहेत असं भाजपवाल्याना वाटत असल्यामुळेच दिल्लीच्या वरिष्ठांकडेही त्यांनी तक्रारी केल्या आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सर्व कारणामुळेच शिवसेनेतील निष्क्रिय पाच मंत्र्यांना हटवण्याचा निर्णय असू शकतो असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.