बाळासाहेबांची शिवसेना जळगावात नंबर वन करणार; ‘या’ नेत्याने ठाकरे गटाला पुन्हा डिवचले…

| Updated on: Jan 16, 2023 | 12:28 AM

या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना आणखी बळकट होणार असल्याचेही बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून आपला पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना जळगावात नंबर वन करणार; या नेत्याने ठाकरे गटाला पुन्हा डिवचले...
Follow us on

जळगाव: महाविकास आघाडीचे सरकार पाडून नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. आज पुन्हा एकदा जळगावमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठाकरे गटासह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आता बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी उभारी मिळणार असल्याचा विश्वास आमदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाद सुरू आहेत. त्यातच जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला बळ मिळाले असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना आणखी बळकट होणार असल्याचेही बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून आपला पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

आमदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश केला आहे. गुलाबराव पाटील आगे बडो, हम तुम्हारे साथ है च्या जयघोषात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या गटालाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा एकदा जोरदार लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.