जळगावात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी पिकांचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या वातावरणात बदल झाला असून, बदलत्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने (rain) हजेरी लावली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये देखील काल मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

जळगावात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी पिकांचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात
महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढणार
Image Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 9:00 AM

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या वातावरणात बदल झाला असून, बदलत्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने (rain) हजेरी लावली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये देखील काल मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे (Untimely rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या पावसाचा कांदा, मक्का, बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा या सारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अवकाळी पावसामुळे शहरात देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते, आता अवकाळी पावसामुळे रब्बी पीक संकटात सापडले आहे.

शेतकरी संकटात

गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका कायम आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचा मोठा फटका सोयाबीन, बाजरी, कापूस यासारख्या खरीप हंगामातील पिकांना बसला होता. अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली होती. या परिस्थितीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेतात पेरणी केली. पिकांना वाढवले मात्र, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. या अवकळी पावसाचा मोठा फटका हा गहू, उन्हाळी बाजरी, कांदा, हरभारा या सारख्या पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

 वेधशाळेने वर्तवला होता अंदाज

संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात काल आणि आज गारपिटीची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तसेच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | सब कहते है तुने मेरा दिल ले लिया, दत्तामामांच्या पत्नीचा गाण्यावर ठेका

मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण