गुलाबराव पाटील यांचं जळगावात ठाकरे गटाला ओपन चॅलेंज, म्हणाले….

शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला ओपन चॅलेंज दिलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला जळगावची जागा सुटली आहे. यावरुन गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

गुलाबराव पाटील यांचं जळगावात ठाकरे गटाला ओपन चॅलेंज, म्हणाले....
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 9:02 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 2 मार्च 2024 : जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं, असं चॅलेंज शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. महाविकास आघाडीत जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटली आहे. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचे ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. “ते डिपॉझिट वाचवू शकत नाहीत. बाकी काय बोलायचं”, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे. या ठिकाणी ठाकरे गटाकडून तयारी सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला खुलं आव्हान दिलं आहे. जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं. डिपॉझिट ते वाचवू शकत नाही. बाकी काय बोलायचं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे .मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जळगाव लोकसभा मतदारसंघात या निमित्ताने वातावरण तापल्याच पाहायला मिळत आहे.

ठाकरे गटाला कोणकोणत्या जागा सुटल्या?

दरम्यान, ठाकरे गटाला किती आणि कोणकोणत्या लोकसभेच्या जागा सुटल्या आहेत याबाबतची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. ठाकरे गटाच्या आतापर्यंत 18 जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. तसेच या जागांसाठी उमेदवारही जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी

  • कल्याण – सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
  • मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर
  • पालघर – भारती कामडी
  • छ. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • नाशिक – विजय करंजकर
  • रायगड – अनंत गीते
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  • मावळ – संजोग वाघेरे
  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • वाशिम-यवतमाळ- संजय देशमुख
  • परभणी – संजय जाधव
  • शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  • जळगाव – हर्षल माने
  • हिंगोली – नागेश आष्टिकर
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.