सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची EXCLUSIVE यादी Tv9 मराठीकडे

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप निश्चित झालंय. काही जागांवर अंतिम शिक्कामोर्तब 5 किंवा 6 तारखेच्या बैठकीत होणार आहे. पण 42 जागांवर मोहोर लागली असून, त्या जागांची आणि संभाव्य उमेदवारांची माहिती 'TV9 मराठी'च्या हाती लागली आहे.

सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची EXCLUSIVE यादी Tv9 मराठीकडे
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 8:35 PM

मुंबई | 2 मार्च 2024 : महाराष्ट्र आणि देशात लोकसभा निवडणुकीचं बिगूल आता कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी देशातील उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर केली आहे. या यादीत 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही दिग्गजांना या यादीतून वगळण्यात आलं आहे. भाजप सारखंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपासाठी सातत्याने बैठकांचं सत्र पार पडलं. या बैठकांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या 42 जागांचं वाटप झालं असून उमेदवारही निश्चित झाले आहेत. तर 6 जागांवर तिढा कायम आहे. हा तिढा लवकरच सोडवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यासाठी बऱ्यात हालचालीदेखील मविआत घडत आहे.

महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करणारी बैठक, 5 किंवा 6 तारखेला होणार आहे. पण 42 जागांवर मविआतल्या तिन्ही पक्षात एकमत झालं आहे. उमेदवारही ठरल्याची माहिती TV9ला मिळालीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याची जागा वंचितसाठी सोडली जाणार तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जाणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पुन्हा इशारा देत आम्ही स्वतंत्र लढल्यास 6 जागा जिंकू शकतो असं म्हटलं आहे. वंचितनं 27 जागांची मागणी केलीय. त्यामुळे 1-2 जागांवर समाधान होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर सूचवू पाहत आहेत. अर्थात 5 किंवा 6 तारखेच्या बैठकीत सर्व स्पष्ट होईल.

कोणत्या जागेवर कुणाला उमेदवारी मिळणार?

शिवसेना ठाकरे गटाची यादी

  • कल्याण – सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
  • मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर
  • पालघर – भारती कामडी
  • छ. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • नाशिक – विजय करंजकर
  • रायगड – अनंत गीते
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  • मावळ – संजोग वाघेरे
  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • वाशिम-यवतमाळ- संजय देशमुख
  • परभणी – संजय जाधव
  • शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  • जळगाव – हर्षल माने
  • हिंगोली – नागेश आष्टिकर

काँग्रेसकडे कोणत्या जागा गेल्यात आणि कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळू शकते?

  • मुंबई उत्तर मध्य – उमेदवार अजून ठरला नाही
  • पुणे – मोहन जोशी किंवा रविंद्र धंगेकर
  • सोलापूर – प्रणिती शिंदे
  • भंडारा – नाना पटोले
  • चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर किंवा विजय वडेट्टीवार
  • अमरावती – बळवंत वानखेडे किंवा राहुल गडपाले
  • गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी , डॉ. नामदेव किरसान किंवा डॉ. नितीन कोडवते या तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते
  • नांदेड – आशा शिंदे
  • लातूर – अजून नाव ठरलं नाही
  • धुळे – तुषार शेवाळे किंवा श्यामकांत सनेर
  • नंदुरबार – के.सी.पाडवी
  • वर्धा – हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख
  • नागपूर – अभिजित वंजारी,विशाल मुत्तेमवार किंवा प्रफुल गुडधेंपैकी एका उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे
  • जालना – उद्याप उमेदवार निश्चित नाही

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 9-11 जागा जावू शकतात, पाहुयात यादी

  • बारामती – सुप्रिया सुळे
  • शिरूर – अमोल कोल्हे
  • सातारा – श्रीनिवास पाटील किंवा त्यांचा मुलगा सारंग पाटील
  • माढा – लक्ष्मण हाके, हाके सध्या ठाकरे गटाचे प्रवक्ते, मात्र राष्ट्रवादीतून लढण्याची शक्यता
  • रावेर – एकनाथ खडसे
  • दिंडोरी – चिंतामण गावित
  • बीड – नरेंद्र काळे
  • अहमदनगर – निलेश लंके
  • भिवंडी – बाळ्या मामा
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.