AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक आणि जागावाटपावर बाळासाहेब थोरात यांची सविस्तर प्रतिक्रिया; म्हणाले…

Balasaheb Thorat on Loksabha Election 2024 and Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीतील जागावाटपावर काँग्रेसची सविस्तर प्रतिक्रिया, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय म्हणाले? भाजपवर टीका करताना बाळासाहेब थोरातांनी काय म्हटलं? वाचा...

लोकसभा निवडणूक आणि जागावाटपावर बाळासाहेब थोरात यांची सविस्तर प्रतिक्रिया; म्हणाले...
| Updated on: Mar 02, 2024 | 4:28 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 02 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा आहे. मुंबईतील भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार? यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची देखील मागणी आहे. मात्र काँग्रेसची देखील मागणी असणार आहे. पहिली जागा काँग्रेसची या ठिकाणी होती. आणि काँग्रेसलाच मिळाली पाहिजे जागा वाटपाचा निर्णय सुरू आहे. नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या वादावर थोरातांची प्रतिक्रिया

शिंदे गटाचे नेते दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात बाचाबाची झाली. यावरही बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. हे खोके सरकार आहे. पण यांची आपापसतच भांडण सुरू आहेत. एक आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो .अनेक आमदार लोकांना मारत आहेत. आमदारांमध्ये यांची धरपकड झाली विधान सभा पटांगणा झाले हे दुर्दैवाची गोष्ट आहे कोणताही कंट्रोल त्यांच्याकडे नाही. सर्व संयम त्यांचे सुटलेले आहे. सरकारची प्रतिमा पूर्ण पणे मालिन झाली आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

देशातील प्रश्नांकडे लक्ष हवं- थोरात

देशात महागाई वाढली आहे . शेतकऱ्यावर भार देऊ नये. शेतकऱ्यांना मारून हे स्वस्त देण्याचं काम देत आहे. निर्यात बंदी केलेली आहे शेतकरी अडचणीत आहे. सामान्य मध्यमवर्गी अडचणीत आहेय जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे, असं म्हणत थोरातांनी सरकारवर टीका केली आहे.

“जाती-धर्माचं राजकारण करू नये”

शरद पवार यांनी जातीचा उल्लेख केला असं मला वाटत नाही. मनोज जरांगे पाटील यांना या मानसिकतेला नेऊन ठेवण्याला कोण जबाबदार आहे? आम्ही देखील त्यांच्या जातीबाबतच्या विधानांना सहमत नाही. महाराष्ट्रात जाती धर्माचे राजकारण करू नये, हे आमची देखील अपेक्षा आहे. सोपं राजकारण म्हणजे जाती-धर्माचे राजकारण आहे. त्यामुळे सत्ता मिळण्यासाठी जाती-धर्माचे राजकारण भाजप करत आहे.मूळ प्रश्नापासून विचलित करण्यासाठी भाजप पक्ष काम करत आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.