Raksha Khadse: त्यांनी त्यांचं बघावं आम्ही आमचं बघतोय, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी शिंदेंच्या आमदाराला सुनावलं

Raksha Khadse Big Statement: खानदेशात महायुतीतील खडाजंगी यावर्षीच्या सुरुवातीलाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसून आली. नाशिकपासून ते पार जळगाव जिल्ह्यात त्याचे साईड इफेक्ट पाहायला मिळाले. आता महायुतीमधील कलगीतुरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा बँक खडसे मुक्त करण्यावरून शिलगली आहे.

Raksha Khadse: त्यांनी त्यांचं बघावं आम्ही आमचं बघतोय, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी शिंदेंच्या आमदाराला सुनावलं
रक्षा खडसे, चंद्रकांत पाटील
| Updated on: Sep 27, 2026 | 11:24 AM

किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : नाशिकपासून ते पार जळगावपर्यंत शिंदे सेना आणि भाजपमध्ये भांड्याला भांड वाजल्याशिवाय राहत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन उभ्या देशाने पाहिले. आता महायुतीमधील कलगीतुरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक खडसे मुक्त करण्याची तुतारी शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी फुंकली आणि वादाची ठिणगी पडली. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी त्यांना या मुद्यावरून सुनावले.

ते त्यांच्या हातात नाही

जिल्हा बँक खडसे मुक्त करायचं हे आमदार चंद्रकांत पाटलांच्या हातात नाही, अशी खणखणीत प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली. जे सभासद आहेत ते ठरवतील. मला निवडणुकीत उभं राहायचं आहे तर मी उभे राहणार. ते ठरू शकत नाहीत की मी उभ़ राहायचं की नाही, असा स्पष्ट संदेश रक्षा खडसे यांनी दिला. आमदारांनी त्यांचं बघावं आम्ही आमचं बघतोय. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचं राजकारण हे आम्हाला विरोध करून चालतय-केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचं आमदारांना प्रत्युत्तर दिलं. घराणेशाहीच्या आरोप करण्यावरून त्यांनीदेखील एकदा आरशामध्ये बघावं. अनेक जण एका घरातून जिल्हा बँकेत आहेत त्यांचा हिशोब त्यांनी जिल्ह्यातून घ्यावा, असे टोलाही चंद्रकांत पाटील यांना खडसे यांनी लगावला.

खडसे कुटुंबियांवर चंद्रकांत पाटील यांची टीका

मंत्रीपद पण सांभाळायचं आणि जिल्हा बँकेत पण जायचं हे कुठेतरी थांबायला हवा आणि खडसे मुक्त जिल्हा बँक असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे, अशी मोठी प्रतिक्रिया शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे माध्यमांशी बोलताना दिली. जिल्हा बँकेत बेकायदेशीर ठराव करून बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेत ठरवा बाबत मंत्री पदाचा दुरुपयोग केला जातो. खडसे तीस वर्ष या बँकेत सहभागी आहेत. कायदा मोडून तोडून सत्तेत सहभागी व्हायचा आणि मिलिंदा खायचा खडसे कुटुंबियांचा प्रयत्न आहे. याबाबत मी कायदेशीर लढाई लढत आहे आमदार चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावर आणि खडसे कुटुंबीयावर टीका केली आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वादही जगजाहीर असतानाच आता जिल्ह्यात बडे नेते हे खडसे कुटुंबियांविरोधात एक मोट बांधत तर नाही ना? अशी कुजबुज जिल्ह्यात सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us