AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून… रीलस्टारच्या कांडामुळे महाराष्ट्र हादरला

जालना शहरातील मोंढा परिसरात घर दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका 'रील स्टार' महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, या ब्लॅकमेल प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून... रीलस्टारच्या कांडामुळे महाराष्ट्र हादरला
रीलस्टारह तिघांना अटक
| Updated on: Jul 17, 2026 | 12:30 PM
Share

जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात घर दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका रील स्टार महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सर्व आरोपींकडून सुमारे 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ब्लॅकमेल प्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली असून अख्खं राज्य हादरलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती हा परतूर तालुक्यातील 45 वर्षांचा पुरूष आहे. त्याची रीलस्टार असलेल्या या महिला आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर या महिलेने त्याला घर दाखविण्याच्या बहाण्याने जालना शहरात बोलावून घेतलं होतं. पीडित व्यक्ती जालन्यात आल्यानंतर आरोपी महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला एका ठिकाणी नेले. मात्र तिथे वेगळाच प्रकार घडला. तिथे त्या महिलेने आणि तिच्या साथीदाराने, त्या इसमावर दबाव टाकला, एवढंच नव्हे तर त्याला मारहाण देखील करण्यात आली. आणि त्यानंतर आणखी भयानक प्रकार घडला. तेथे त्यांनी त्या इसमाचे अश्लील फोटो काढले.

सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी देत आरोपींनी पीडित व्यक्तीकडून पैशांची मागणी केली. त्याला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं. या प्रकारात आरोपींनी त्या इसमाकडे 75 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने लुटल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात

घडलेल्या प्रकारामुळे पीडित हादरला, मात्र त्याने कशीबाशी हिंमत गोळा करत पोलिसांत धाव घेतली. तिथे जाऊन पीडित व्यक्तीने पोलिसांसमोर सर्व प्रकार कथन केला अन् अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. या गंभीर गुन्ह्याची पोलिसांनी तातडीने दखल घेतली. तक्रारीच्या आधारे चंदनझिरा पोलिसांनी तपास सुरू करून या टोळीचा पर्दाफाश केला आणि संबंधित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 14 हजार रुपयांचा समावेश असल्याचे समजते.

दरम्यान, या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना लक्ष्य केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तपास अधिक वेगाने सुरू असून, या प्रकरणातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...