Arjun Khotkar | शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात, अर्जुन खोतकरांची तब्बल 18 तास चौकशी

| Updated on: Nov 27, 2021 | 7:11 AM

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने (ED Raid) शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळी धाड टाकली. तसेच, ईडीने तब्बल 18 तास अर्जुन खोतकर यांची चौकशी केली.

Arjun Khotkar | शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात, अर्जुन खोतकरांची तब्बल 18 तास चौकशी
arjun khotkar
Follow us on

जालना : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने (ED Raid) शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळी धाड टाकली. तसेच, ईडीने तब्बल 18 तास अर्जुन खोतकर यांची चौकशी केली.

किरीट सोमय्यांचा आरोप

काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने अर्जुन खोतकरांच्या घरावर छापा टाकला.

जालन्यातील अर्जुन खोतकर यांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात शुक्रवारी सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक दाखल झाले. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी सुरु केली. यावेळी अर्जून खोतकर घरीच होते, अशी माहिती आहे. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती.

खोतकर यांचा बंगला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही ईडीने झाडाझडती केली. किरीट सोमय्यां यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांच्यावर गैर व्यवहाराचे आरोप केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आज अर्जुन खोतकर ईडीने केलेल्या या कारवाई संबंधी माहिती प्रसारमाध्यमांना देणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीची तपासणी

अर्जुन खोतकर हे सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचीही ईडीकडून तपासणी करण्यात आली. जालन्यात आज सकाळीच या दोन ठिकाणी सक्तवसुली संचलनालयातर्फे धाडी टाकण्यात आल्याने शहरात एकच खळबळ माजली होती.

संबंधित बातम्या :

ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार