MSRTC Bus Accident | जालना जिल्ह्यात एसटीचा अपघात, 42 प्रवाशांसह मुंबईकडे जाणारी बस 50 फूट खाली कोसळली

| Updated on: Aug 08, 2023 | 9:17 PM

जालना जिल्ह्यात एका एसटी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

MSRTC Bus Accident | जालना जिल्ह्यात एसटीचा अपघात, 42 प्रवाशांसह मुंबईकडे जाणारी बस 50 फूट खाली कोसळली
Follow us on

जालना | 8 ऑगस्ट 2023 : जालना जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झालाय. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित अपघाताची घटना ही मंठा ते वाटररच्या दरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये 42 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. ही बस 50 फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

विशेष म्हणजे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. एसटी बस ओव्हरटेक करत असताना 50 फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. या अपघातात काही प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरीक मदतीसाठी धावले. तसेच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

मंठा शहराच्या पुढे किलडी फाटा आहे. तिथे एक ब्रिज आहे. या पुलाचं नवीनच काम सुरु झालंय. या दरम्यान रस्त्यावर मोठा ट्रक उभा होता. या ट्रकला ओव्हरटेक करत असताना बस खाली खड्ड्यात कोसळली, अशी माहिती बसच्या कंडक्टरने दिली आहे. बसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये वृद्धांचा देखील समावेश होता. या अपघातात नेमके किती प्रवासी जखमी झाले आहेत, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. पण घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बचाव पथकाकडून शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.