AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भुजबळ राज्यात दंगली घडवणार, माझ्या माणसाला त्रास झाला तर…’; मनोज जरांगें यांचा इशारा

मराठा आंदोलनासाठी बसलेल्या जरांगे यांच्या समर्थकांना उपोषणस्थळी जाताना वडीगोद्री येथे अडवण्यात आल्याने मोठा राडा झाला. जरांगे यांनी थेट मंत्र्यांना फोन केल्याचं समजल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं, या प्रकरणावर बोलताना जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

'भुजबळ राज्यात दंगली घडवणार, माझ्या माणसाला त्रास झाला तर...'; मनोज जरांगें यांचा इशारा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 21, 2024 | 8:55 PM
Share

मनोज जरांगे यांनी गेल्या पाच दिवसांपासून अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. जरांगे यांच्या समर्थकांना अंतरवलीकडे उपोषणस्थळी जात असताना वडीगोद्री येथे अडवण्यात आलं. त्यावेळी मराठा समन्वयक आण ओबीसी आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. जरांगेंनी थेट मंत्र्यांना फोन फिरवल्याचं समजताच तिथले बॅरिकेटिंग हटवण्यात आलं. या प्रकरणावर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांचा मोठा डाव असून त्यांना दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला.

आमचे आणि धनगरांचे वैर नाही आणि ते पिढ्यान पार नाही. लक्ष्मण हाके कोण आलाय भांडण विकत घेणारा, स्वतःला काय जहागीरदार समजतो का? छगन भुजबळ हरामखोर म्हातारपणी गु चिवडायला लागला आहे. म्हातारपनी का डाग लावून घेत आहे. तो हरामखोर भुजबळ इकडे दंगली भडकवून देत आहे. फडणवीसचं एकूण कशाला दंगली लावतो रे. इथे काही झाले तर याला जबाबदार फक्त छगन भुजबळ आणि फडवणीस राहतील, अशा एकेरी शब्दात बोलत मनोज जरांगे यांनी थेट छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

आम्ही बसलो की हे आंदोलनाला बसतात, आम्ही नसल्यावर त्यांनी आंदोलन करावे. यांच्या ढुंगणाला काय साप चावतो का? आम्ही आलो की हे कसे काय येऊन बसतात. कशामुळे मराठ्यांचे आणि धनगरांची भांडणे लावायचे आहे. धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्ही काय मस्ती लावली का? हे गरीब धनगरांना हे सर्व माहित असल्याचं जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षण संदर्भात सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना निर्णय घ्यावा लागणार आहे, हे भांडण लावण्याचे कुचल धंदे बंद करा. निर्णय घ्यायचं शिका. आम्हाला राजकारणाचं काही देणे घेणे नाही, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. छगन भुजबळ राज्यात दंगली घडवणार आहे, जर माझ्या माणसाला त्रास झाला तर जालन्याच्या एसपीला सांगतो केसेस नोंदवून घ्या. वडीगोद्रीमधून येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या माणसाला धोका आहे. जालन्याच्या एसपीला सांगतो माझ्या माणसाला तिथे धोका आहे, आणि कुणी माझ्या मराठ्याला त्रास झाला तर त्यांच्यावर 307 चे गुन्हे दाखल करा, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच