
राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पेटलेला असताना आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सगेसोयरे भेसळ असल्याचं म्हटलं होतं. यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.
मंत्र्यांनी न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासाकांनी मिळून ठरवलेली आहे. आणि ती पक्की आहे आणि टिकणार सुद्धा, त्याच्यात सगळ्या जाती-धर्मांना न्याय मिळणार आहे.ते जर भेसळ असेल ,तर 50% च्या वर दोन टक्के दिलेल आहे हेही भेसळच असणार आहे. 180 जाती आरक्षणात घातल्या होत्या आता साडेतीनशे-चारशे जाती झाल्या,त्याही भेसळ असतील मग घातलेल्या. त्याच्यावरही आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे एक्सट्रा जाती कुठून आल्या. प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा बोगस शब्द वापरू, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाज संपवावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये. त्यांच्याकडून सगळ्यांना सारखं चौफेर टाईट बोलण्यात यावं. सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे. ही जनतेची अपेक्षा आहे त्यापेक्षा माझी जास्त आहे. सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना याच कारणाने मानतात कि ते स्पष्ट बोलतात,खर आहे ते बोलतात, एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी सगळीकडून सारखी मांडणी करावी एवढीच आमची अपेक्षा असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
गरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे हे 70 वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही. श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात होते. यांच्या मनात गोरगरिबांना मोठे होऊ देऊ हे नव्हतं म्हणून तर मी गरीब माझा समाज गरीब म्हणून आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली. श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही म्हणून आमची लढाई आम्ही उभे केले आणि जिंकत आणल्याचं मनोज जरांगे म्हणाले.