AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इस्लाम धर्मात जाती आहेत का?’, जरांगेंनी निवृत्त न्यायाधीशांना कोंडीत पकडलं

राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात दाखल झालं. या शिष्टमंडळात आमदार बच्चू कडू यांच्यासोबत निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील सुक्रे देखील आले. या दोन्ही निवृत्त न्यायामूर्तींनी मराठा नेते मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

'इस्लाम धर्मात जाती आहेत का?', जरांगेंनी निवृत्त न्यायाधीशांना कोंडीत पकडलं
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 03, 2023 | 9:59 AM
Share

जालना | 2 नोव्हेंबर 2023 : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात दाखल झालं. या शिष्टमंडळात आमदार बच्चू कडू यांच्यासोबत निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे देखील आले. या दोन्ही निवृत्त न्यायामूर्तींनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड यांच्या नेतृत्वातील समितीने मराठा आरक्षणासाठी संशोधन केलं होतं. या समितीने मराठा आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा केला होता. या दोन्ही वकिलांनी मनोज जरांगे यांना मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल, असं आश्वासन दिलं. डेटा बनवण्याचं काम सध्या सुरु आहे. त्रुटी दूर करण्याचं काम सुरु असल्याचं या दोन्ही निवृत्त न्यायाधीशांनी सांगितलं.

“आरक्षणाचा मुद्दा एक-दोन दिवसात सुटण्यासारखा नाही. घाई गडबडीत घेतलेला निर्णय कोर्टात टिकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी वेळ द्यायला हवा. याबाबत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरु आहे. मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल”, असं निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलं.

“सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आलीय. आरक्षणासाठी मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी इम्पेरिकल डेटा महत्त्वाचा आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जातोय”, असं निवृत्त न्यायमू्र्तींनी जरांगेंना सांगितलं. कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय होईल. मागास मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, असं आश्वासन निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे यांनी दिलं.

“तुम्हाला मराठ्यांमध्ये मराठा आणि कुणबी वेगळा असा फरक करायचा आहे का?”, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला. त्यावर निवृत्त न्यायमूर्तींनी उत्तर दिलं. “मागासवर्ग आयोगाने ज्या ज्या जाती मागासलेल्या आहेत असं निरीक्षण केलं त्या सर्व जातींना आरक्षण दिलेलं आहे. यामध्ये मराठा ही मागासलेली जात आहे, असं नमूद झालेलं नाही. हे सुप्रीम कोर्टानेदेखील म्हटलं आहे. पण आपण त्यात सुधारणा करत आहोत”, असं निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलं.

‘इस्लाम धर्मात जाती आहेत का?’

“माळी समाजाचा व्यवसाय शेती, बागवान समाजाचा व्यवसाय शेती, जाती भिन्न-भिन्न आहेत. मुस्लीम धर्मात जाती आहेत का? याचं तुम्ही मला उत्तर द्या. इस्लाम धर्मात जाती आहेत का? तर या 11 जणांना तुम्ही आरक्षण दिलं कसं?”, असे प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केले.

जरांगेंच्या इस्लाम धर्माच्या प्रश्नावर निवृत्त न्यायाधीशांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता जे काही करायचं आहे त्यामध्ये एक अडचण अशी आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तुम्ही या पद्धतीने करा. म्हणून आपण या पद्धतीने करु”, असं निवृत्त न्यायाधीश म्हणाले.

निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंना काय-काय सांगितलंय?

  • सुप्रीम कोर्टातलं कामकाज दृष्टिपथात आलं आहे. घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायला नको.
  • एक-दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नसतं.
  • कोर्टात असं आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे थोडा वेळ द्या
  • कोर्टात आपल्या बाजूने निर्णय होईल. मागास मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल.
  • आम्ही एका बाजूने अहवाल गोळा करतोय. एक ते दोन महिन्यात सगळा अहवाल तयार होईल.
  • एकूण किती टक्के मराठा समाज मागास आहे हे त्यातून कळेल.
  • मराठा मागास हे सिद्ध झालेलं नाही. सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे.
  • आपण एक नवीन आयोग करणार आहोत. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आपण कार्यवाही करत आहोत.
  • रक्ताचं नातं असेल तर कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल.
  • जातप्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. ही मागणी निवृत्त न्यायमूर्तींनी लिहून घेतली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?