जरांगे पाटील यांची सभा, सदावर्तें यांची शंका, माहिती देतं कोण? ‘या’ नेत्याने भाजपला कोंडीत पकडलं

आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादा सुप्रीम कोर्टाने लावलेल्या आहेत. जातीय निहाय जनगणना झाली की हे आरक्षणाचे प्रश्न मोकळे होतात. परंतु, भाजप मुद्दाम जातीय निहाय जनगणना करू इच्छित नाही. महाराष्ट्र मध्ये जातीय तणावाचे मुळ भाजप आहे.

जरांगे पाटील यांची सभा, सदावर्तें यांची शंका, माहिती देतं कोण? 'या' नेत्याने भाजपला कोंडीत पकडलं
SHARAD PAWAR, MANOJ JARANGE PATIL AND GUNRATNA SADAVARTEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 7:46 PM

भंडारा : 14 ऑक्टोबर 2023 | कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापुरात दंगलीची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर प्रत्यक्षात दंगल घडली. तेव्हा गृहमंत्री यांनी सतेज पाटील यांच्या दाव्यावर शंका उपस्थित केली. आता जरांगे यांच्या सभेआधी तिथं हिंसक घटना घडतील, अशी माहिती गुणरत्न सदावर्तें यांना कोण देतं याच्या चौकशीची मागणी सोशल मीडियात होऊ लागलीय. यावरून कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेलिंग केली जातेय. चायनीज ॲपच्या माध्यमातून कर्ज दिले जायेत. ॲपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जातं. नाशिकमध्ये एमडी ड्रग्स माध्यमातून नवीन पिढीला कसं काय बरबाद केलं हे पाहिलं. राज्यात जनतेची कशी लूट सुरू आहे पाहत आहोत. कोल्हापूर मध्ये जे घटना घडत आहेत गृहमंत्रालय गृहखात जबाबदार आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.

कुणावर आरोप करण्यापेक्षा ज्यांना खोक्याचे आमदार अशी वाक्य रचना लोकांनी दिली. त्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. त्या आमदारांना वाय प्लस सुरक्षेची गरज काय? जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी? जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस नाहीत आणि त्यांना वाय प्लस सुरक्षा. एकीकडे पोलीस भरती करायची आणि तेही कंत्राटी पद्धतीने. जर पोलीसच आऊट सोर्सिंग झाले आणि ते कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात राहणार तर जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

जबरदस्ती नाही स्वेच्छेने निवृत्ती घ्यावी. उदयनराजे यांनी शरद पवार यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावं असा सल्ला दिलाय. त्यावर नाना पटोले यांनी ‘लोकशाहीमध्ये कोणाला थांबवता येत नाही. मर्यादा आहे असे नियम आपल्याला ठरवता येत नाही. ज्याला निवृत्ती करायचे त्याला जबरदस्ती करायची नाही. त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घ्यावी’ असे सांगितले.

हे सुद्धा वाचा

जरांगे यांच्यामागे शरद पवार असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्तें यांनी केला. मात्र, सदावर्तें यांच्यामागे कोण आहे याचीही चर्चा होतेय. जातीयवादाची आग भाजपने लावली. 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर मराठा, धनगर, हलबा, गोवारी अशा अनेक जातींना राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार आलं की आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. दहा वर्ष हे आरक्षणाच्या प्रतीक्षेत होते. आता सरकार जाण्याची वेळ आलेली आहे. भाजपने दिलेला आश्वासनाची पूर्तता केली नाही, अशी टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....