तुम्ही स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून पाहा, तुम्ही कोण आहात? संजय राऊत कुणावर बरसले?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या आंदोलनापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी लाड व सरकारवर 'शंढ' म्हणत जोरदार टीका केली आहे. पोलिसांनी धमकी प्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

तुम्ही स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून पाहा, तुम्ही कोण आहात? संजय राऊत कुणावर बरसले?
संजय राऊत बरसले
| Updated on: May 22, 2026 | 11:14 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून 30 मे या तारखेची घोषणाही करण्यात आली. मात्र या मुद्यावर चर्चा करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड हे आज मनोज जरांगेंची भेट घेत असून त्यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली. जरांगे यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते आणि त्याच वेळी त्यांना धमकीचे 2-3 फोन आले. हॉटेलमध्ये घुसून मारू अशी धमकी लाड यांना देण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत दोघांना अटकही केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

लाड यांना आलेल्या या धमकीची राज्यभरात चर्चा सुरू असून याच मुद्यावरू आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत मात्र चांगलेच बरसले आहेत. एक धमकी आली तर हे घाबरले, हे किती शंढ आहेत ते दाखवून दिलं आहे असं म्हणत संजय राूत यांनी प्रसाद लाड तसेच सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

संजय राऊतांनी साधला निशाणा

भाजप नेते प्रसाद लाड यांना कोणीतरी धमकी दिल्याच मी पाहिलं. पण यांना कोण धमकी देणार ? एक धमकी आली तर हे घाबरलेत. हे किती शंढ आहेत ते या देशाला दाखवून दिलं आहे. माझा विश्वास नाही की अशा लोकांना धमक्या येत असतील. एवढी सिक्युरिटी तुमच्याकडे आहे. यांच्या स्वत:च्या चार गाड्या आहेत, सरकारच्या 25 गाड्या असतात. तुम्ही काय भगतसिंग, राजगुरू आहात का ? तुम्ही स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून पाहा तुम्ही कोण आहात, असं म्हणत राऊतांनी थेट हल्ला चढवला

दोन पायांच्या झुरळांना चांगले दिवस येतील, ते सरकारला सळोकी पळो करुन सोडतील

सध्या देशभरात कॉकरोच जनता पार्टीचा बोलबाल असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक विधान करत बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. त्यानंतर संतापलेल्या अभिजीत दिपके या तरूणाने या पक्षाची स्थापना केली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इन्साटवरही त्यांचे फॉलोअर्स वाढले असून 1 कोटीहू अधइक आकडा आहे. सर्वात जुना पक्ष काँग्रेस आणि सर्वात मोठा पक्ष भाजपा, यांनाही या पक्षाने पछाडलं असुन सर्वाधिक फॉलोअर्स या पक्षाचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या पक्षाचं एक्स (पूर्वीच ट्विटर) अकाऊंट नुकतंच बॅन करण्यात आलं होतं.

याच कॉकरोच पार्टीवरही राऊतांनी भाष्य केलं, बॅनवरही ते बोलले. बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सिस्टीम वर आधी हल्ला केला होता. अकाऊंट कोणाचं बॅन केलं जातं नाही ? देशातील झुरळांचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आभार मानावेत.

झुराळांना मारण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी अनके औषध काढली, तरी झुरळं आहेतच. दोन पायांच्या झुरळांना चांगले दिवस येतील, ते सरकारला सळो की पळो करुन सोडतील. झुरळ पक्षाचा जाहीरनामा वाचला मी. जेव्हा तरुण विद्रोहासाठी उभा राहतो तेंव्हा त्याची भावना समजून घेतली पाहिजे, ज्यांच्यावर अन्याय झाले आहेत त्याचा हा आवाज आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

Follow Us