AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी दहशतवाद्याचा भयानक खेळ, पाच साथीदारांच्या मदतीने मोठा डाव; थेट फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि…

पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टी सोशल मीडियाचा वापर करून भारतीय तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करत होता. आर्थिक आमिषे दाखवून तो स्लिपर सेल तयार करण्याचा प्रयत्न करत होता. एटीएसने वेळीच हा कट उधळला. राज्यातील १०२ व्यक्ती त्याच्या संपर्कात असून, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन एटीएसने केले आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्याचा भयानक खेळ, पाच साथीदारांच्या मदतीने मोठा डाव; थेट फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 11, 2026 | 1:40 PM
Share

पाकिस्तानी दहशतवाद्याचा भयानक खेळ समोर आला आहे. पाच साथीदारांच्या मदतीने भारतात मोठा कट रचण्याचा त्याने प्लान केल्याचं उघड झालं आहे. भारतातील असंख्य तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न या अतिरेक्यांनी केला होता. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला असल्याचं उघड झालं आहे. भारतीय तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा या दहशतवाद्यावर आरोप आहे. शहजाद भट्टी असं त्याचं नाव आहे. त्याच्या साथीदारांची नावेही समोर आली आहेत. एटीएसने वेळीच भट्टीचे मनसुबे उधळल्याने देशात मोठा घातपात होण्याचा धोका टळला आहे. गेल्या तीन दिवसांपासून एटीएस भट्टीच्या कारवायांची पाळंमुळं खणून काढत आहे.

भारतीय तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील 102 व्यक्ती आहेत. त्यामुळे पालकांनी सतर्क राहावे, असं आवाहन एटीएसने केलं आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेला पाकिस्तानातील संघटीत टोळीचा म्होरक्या आणि दहशतवादी हस्तक शहजाद भट्टी यांच्याशी संबंधित 102 व्यक्तींची माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली आहे. एटीएस मार्फत या सर्वांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. भट्टी याच्या साथीदारांनी भारतातील तरुणांची दिशाभूल करुन त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील पालकांना सावध राहण्याचे आणि आपल्या पाल्यावर नजर ठेवण्याचे आवाहन दहशतवादविरोधी पथकाने केले आहे.

पाच जण भडकवत आहेत…

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आबीद जाट ऊर्फ आबीद छल, अजमल गुजर, हम्माद मेनन, राणा हुसैन, आश्रफ बशीर आलम हे भट्टचे साथीदार भारतीय तरुणांमध्ये जाळं पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप या समाज माध्यमांचा वापर करुन तरुणांशी मैत्री करीत आहेत. धार्मिक वा इतर संवेदनाशील माहिती समाज माध्यमांवर टाकून भडकावणे, बेरोजगार वा गरजू तरुणांना आर्थिक आमिषे, देशविघातक कृत्यासाठी स्लिपर सेल तयार करणे, अंमली पदार्थ तस्करी आदी मार्गाने तरुणांना फितवले जात असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

चंद्रपुरात तीन तरुणांची कसून चौकशी

दरम्यान, देशातील तरुणांना पैशांचे आमिष दाखवून देशविरोधी आणि घातपाती कृत्यांकडे खेचणाऱ्या पाकिस्तानमधील कुप्रसिद्ध दहशतवादी शहजाद भट्टी याने सोशल मीडियावर मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. तो भारतातील आणि प्रामुख्याने स्थानिक भागातील बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चंद्रपूर पोलिस आणि दहशतवादविरोधी पथक हायअलर्टवर आले असून शहजाद भट्टीला सोशल मीडियावर फालो करणाऱ्या तीन संशयित तरुणांची कसून चौकशी करण्यात आली. यात दुर्गापूर येथील एक आणि घुग्घुस येथील दोन तरुणांचा समावेश असल्याची माहिती आहे.

नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन नसलेल्या बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना पैशांचे मोठे आमिष दाखवले जाते. सुरुवातीला ही कामं अत्यंत साधी वाटत असली, तरी त्यामागे देशात दहशत पसरवण्याचा मोठा कट असल्याचे समोर आलं आहे. तरुणांना सुरुवातीला अशी कामे दिली जातात, ज्यामुळे आपण कोणत्याही देशविरोधी किंवा दहशतवादी कृत्यात सामील होत आहोत, याचा त्यांना संशयही येत नाही. पैशांच्या गरजेपोटी गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण या कामांना सहज तयार होतात. मात्र, या सर्व प्रकरणांची लिंक थेट पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी जोडलेली आहे. जिल्ह्यातही त्या गँगस्टरला फॉलो केले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दुर्गापूर येथील एक आणि घुग्घुस येथील दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांच्याकडून कोणतीही संशयास्पद माहिती किंवा थेट देशविघातक कृत्यांमधील सहभाग निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, पोलिस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

संभाजीनगरात 10 जणांची चौकशी

तर, एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने मराठवाड्यातील 15 संशयितांची तब्बल 10 तास कसून चौकशी केली. छत्रपती संभाजीनगरमधील 10, धाराशिवमधील 2, जालन्यातील 2 आणि बीडमधील 1 अशा एकूण 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करून डिजिटल धागेदोरे पडताळण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर सर्वांना सोडून देण्यात आले असून, तपासाच्या गरजेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीचे इंस्टाग्राम अकाउंट भारतातून बॅन करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील संशयास्पद संपर्कांबाबत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे.

Follow Us
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा