AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचे शिष्टमंडळ आणायला मी एवढा मोठा आहे का ? गंगाधर काळकुटे यांनी बारस्कर यांना सुनावले

Gangadhar Kalkute On Ajay Baraskar : उगाच खोटे नाटे आरोप करू नका, माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि दोषी आढळल्यास टकमक टोकावरून ढकलून द्या किंवा भर चौकात फाशी द्या असेही गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे

सरकारचे शिष्टमंडळ आणायला मी एवढा मोठा आहे का ? गंगाधर काळकुटे यांनी बारस्कर यांना सुनावले
Gangadhar Kalkute On Ajay Baraskar
| Updated on: Sep 18, 2026 | 7:27 PM
Share

आपल्यातल्या आपल्यात वाद नको, मराठा समाजात चुकीचा मॅसेज जायला नको म्हणून आजपर्यंत अजय बारस्कर आणि अमोल खुनेंवर बोलत नव्हतो. पुरावे असतील तर त्यांनी बोलावं अन्यथा त्यांना महागात पडणार, वेळप्रसंगी त्यांना कोर्टात खेचू अशा इशारा जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे. जरांगे पाटलांच्या घातपाताच्या प्रकरणात मी तक्रार दिली म्हणून तो अडकला असा अमोल खुने याचा समज झाल्याने त्याचा माझ्यावर राग आहे असेही काळकुटे म्हणाले.

भय्यु महाराजांची दोनशे कोटींची जमीन हडपली, पुण्यात सात गुंठे जागा घेतली असे यापुर्वी माझ्यावर आरोप केले गेले. त्याचे पुरावे द्या अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असेही गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे.  उगाच खोटे आरोप करू नका, माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि दोषी आढळल्यास टकमक टोकावरून ढकलून द्या किंवा भर चौकात फाशी द्या असेही काळकुटे यांनी म्हटले आहे. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, पण तीन वर्षांत एकही काम केलेले नाही. मनोज दादांपासून आम्ही बाजूला होऊन दादा एकटे पडावेत असं कोणालातरी वाटतंय, असेही काळकुटे यांनी म्हटले आहे.

अमोल खुणे हा काय ईडीचा प्रवक्ता आहे का?

सरकारचे शिष्टमंडळ आणायला मी एवढा मोठा आहे का?, माझे फोन कॉल्स चेक करा. अमोल खुणे हा काय ईडीचा प्रवक्ता आहे का?,  मी बीडमध्ये आहे, कधीही अटक करा. पुढच्या आठवड्यात आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहोत. संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी पैसे दिले अशा हवेत गोळ्या मारू नका, थेट नाव घ्या कोणाकडे पैसे दिले. आमच्यातल्या आमच्यात चिखलफेक घडवून काही जणांना मजा बघायची आहे. लक्ष्मण हाके, वाघमारे आणि सदावर्तेला तरी तसेच वाटत असावे असेही काळकुठे यांनी म्हटले आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं