Ajit Pawar Death : जय पवार यांच्यावर खरंच कोणाचातरी दबाव? शेवटी समोर येत त्यांनीच सगळं सांगितलं; म्हणाले मी आज…

अजित पवार यांच्या निधनाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच आता जय पवार यांनी आपली पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय का घेतला, याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.

Ajit Pawar Death : जय पवार यांच्यावर खरंच कोणाचातरी दबाव? शेवटी समोर येत त्यांनीच सगळं सांगितलं; म्हणाले मी आज...
jay pawar and ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2026 | 6:17 PM

Jay Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात आणि मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीदेखील डीजीसीएच्या प्राथमिक चौकशी अहवालावर शंका उपस्थित केलेली आहे. मी या अहवालावर असमाधानी आहे, असे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच लवकरच मी अजितदादांचा मृत्यू, विमान अपघाताबाबतची शंका आणि समोर आलेला प्राथमिक चौकशी अहवाल याबाबत सविस्तर बोलणार आहे. लवकरच मी त्यासाठी पत्रकार परिषद घेईन, असे जय पवार यांनी सांगितलेले होते. परंतु ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. याच कारणामुळे जय पवार यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आता स्वत: जय पवार यांनी खुलासा केला आहे.

आम्ही आता सगळे कुटुंब म्हणून…

जय पवार यांनी अजित पवार यांच्या विमानाची फ्लाईट अटेंडट असलेल्या पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानात पिंकी माळी यादेखील होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर जय पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना, पिंकी माळी यांच्या आईशी मी बोललो. हे दु:ख एवढं सहजासहजी मनातून जाणारं नाही. आम्ही आता सगळे कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार आहोत, असे जय पवार यांनी सांगितले.

माझ्यावर कोणाचाही दबाव नाही

पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेईन. त्यावेळी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगणार आहे, असेही यावेळी जय पवार यांनी सांगितले. जय पवार यांनी पत्रकार परिषद पुढे ढकलल्यामुळे त्यांच्यावर दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आमदार रोहित पवार यांनीदेखील तशी शंका उपस्थित केली होती. यावर बोलताना माझ्यावर कोणाचाच दबाव नाही. मी आज पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना भेटायला आलो आहे. मलादेखील या प्रकरणाची अतिरिक्त माहिती हवी आहे. सर्वाच्या पुढे येऊन काहीही बोलण्यात अर्थ नाही. आपल्याला सगळी सत्य माहिती आहे. त्यामुळेच आम्ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, अशी माहितीही जय पवार यांनी दिली.

Follow Us