AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | निवडणुकीपर्यंत शिंदे गटाचं नामोनिशाण मिटणार, 48 जागाही भाजप देणार नाही, जयंत पाटील यांचं गणित काय?

Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या जागावाटपाच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

मोठी बातमी | निवडणुकीपर्यंत शिंदे गटाचं नामोनिशाण मिटणार, 48 जागाही भाजप देणार नाही, जयंत पाटील यांचं गणित काय?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 18, 2023 | 12:49 PM
Share

मुंबई | सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात (Supreme court) कधीही लागण्याची शक्यता असतानाच राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचीही (Assembly Election) जोरदार रणनीती आखली जात आहे. सदैव इलेक्शन मोडवर असलेल्या भाजपमध्ये वेगवान हालचाली सुरु आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून चंद्रशेखर बावनकुळे कामाला लागले आहेत. काल भाजपची प्रसिद्धी प्रमुखांची एक बैठक झाली. यावेळी बावनकुळे यांनी 288 पैकी 240 जागा भाजप लढणार तर शिंदे गटाला 40 जागा देण्यात येतील, असं वक्तव्य केलं. बैठकीतला बावनकुळेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. शिंदे-भाजप युतीत शिंदे गटाकडे 50 आमदारांचं बळ असताना आगामी निवडणुकीतला हा फॉर्म्युला सर्वांना धक्कादायक वाटतोय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नेमकं गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. भाजपने आता कुठे हा फॉर्म्युला जाहीर केलाय. मात्र निवडणुकीपर्यंत शिंदे गटाला फक्त 5 ते 7 जागा देण्यात येतील, असं भाकित जयंप पाटील यांनी केलंय.

जयंत पाटलांचं गणित काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या फॉर्म्युल्यावरून शिंदे-भाजप सरकारला कोंडीत पकडलंय. भाजपचीही ही मूळ रणनीती आहे. कोणताही मतं खाणारा स्थानिक पक्ष जिवंत राहू नये, हे भाजपचं धोरण आहे. तेच अव्याहतपणे सुरु आहे. मग तो मित्र पश्र असो वा शत्रू. पक्ष फोडणे,इतर पक्षांतील नेत्यांवर विविध मार्गांनी कारवाया करणे आणि मग ती मतं आपल्याकडे वळवणे हीच त्यांची नीती आहे. महाराष्ट्रात देखील हेच होणार आहे. शिंदे गटासोबतदेखील हेच होणार आहे. 288 पैकी केवळ 48 जागा देऊ असे बावनकुळे आत्ता म्हणालेत. मात्र निवडणुका येईपर्यंत शिंदे गट हा शेवटपर्यंत अस्तित्व राहणार की नाही, हा प्रश्न आहे, असं जयंत पाटील म्हणाले. शिंदे गट राहिला तरी भाजप निवडणुकीपूर्वी सर्वे करतो.त्यानंतर त्यांना चित्र स्पष्ट होईल. त्यावेळी शिंदेंना सांगण्या येईल की, 48 पैकी एकनाथ तुमच्या ५-६ जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी शिंदेंना फक्त ५ ते ६ जागा मिळतील, असं भाकित जयंत पाटील यांनी केलंय.

बावनकुळेंचं स्पष्टीकरण

राज्यात शिंदे-भाजप युती बरोबरीने निवडणुकीत उतरणार असल्याचं म्हटलं जात असतानाच बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या जागावाटपाच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिलंय. त्या व्हिडिओतील अर्धाच भाग दाखवण्यात आलाय. बैठकीतला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही. शिंदे-भाजप युतीत आम्ही निम्म्या-निम्म्या जागा लढणार असून निश्चितच आम्ही बहुमताने सत्तेत येऊ, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय. भाजपच्या बैठकीतला तो व्हिडिओ होता. तेथे माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. तरीही बैठकीनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे 240-40 च्या फॉर्म्युल्याची भाजपची अंतर्गत रणनीती होती का,अशी चर्चा आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?