AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेलोनीवर इटलीतील तरुण का नाराज? दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनासारखी ठिणगी पडणार? जोरदार चर्चा

Italy PM Giorgia Meloni : जगातील अनेक देशातील तरुणाई सध्या अस्वस्थ आहे. परीक्षा फुटीवरून विद्यार्थ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमोर तरुणाईचे आव्हान उभे ठाकले आहे. 2027 मधील निवडणूक त्यांच्यासाठी कठीण परीक्षा असल्याचे मानले जात आहे. काय आहेत यामागील कारणं?

मेलोनीवर इटलीतील तरुण का नाराज? दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनासारखी ठिणगी पडणार? जोरदार चर्चा
जॉर्जिया मेलोनीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 13, 2026 | 6:50 PM
Share

आता इटलीतील तरुण आणि सरकारमध्ये दरी रुंदावली आहे. वृत्त संस्था रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारविरोधात तरुणाईचा संताप दिसून येत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये इटलीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच तरुणाईने मेलोनी आणि त्यांच्या पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांच्यासाठी तरुणाईतील हा असंतोष डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आक्रोशामागे नेमकी काय आहेत कारणं? इटलीचे तरूण मेलोनी यांच्यावर का झालेत नाराज?

तरुणाई मेलोनी यांच्यावर का रूसली?

Yourtrend नुसार, मेलोनी यांच्या उजव्या सरणीच्या आघाडीवर 35 वर्षांखालील 30% टक्के मतदार फिदा आहेत. या आघाडीत मेलोनी यांचा पक्ष ब्रदर्स ऑफ इटली, माटेओ साल्विनी यांचा League आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो तजानी यांच्या Forza Italia या पक्षांचा समावेश आहे. तर पंतप्रधान झाल्या तेव्हा 2023 मध्ये मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाला 30% जवळपास पाठिंबा मिळाला होता. तर विरोधी आघाडीला जवळपास 50 टक्के मतदारांनी डोक्यावर घेतले होते. इटलीतील विरोधी गोटात डेमोक्रॅटिक पक्ष, 5-Star Movement आणि Left-Green Alliance सारख्या पक्षांचा समावेश आहे.

मेलोनीवर तरुणाई नाराज का?

2022 नंतर देशात बेरोजगारी कमी करण्याचे, तरुणाईला नोकरी देण्याचे वचन पूर्ण करण्यात त्यांना यश आले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. आर्थिक आघाडीवरही त्यांना सरस कामगिरी बजावता आलेली नाही. मेलोनी यांच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काही पावलं टाकली होती. त्याचा तरुणाईवर परिणाम दिसला. अनेक आघाड्यांवर सरकारला मोठे काही करता आलेले नाही. या कारणामुळे 18-34 वयोगटातील मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांच्यात सरकारविरोधात असंतोष उफाळला आहे. पोलिंग एजन्सी ‘Youtrend’ चे प्रमुख लोरेंजो प्रेग्लियास्को यांच्या मते तरुणाई आता डाव्या पक्षांकडे झुकत असल्याचा दावा केला आहे.

रॉयटर्स या वृत्त संस्थेने Luiss University विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक लोरेंजो डी सियो यांच्याशी याविषयावर चर्चा केली. मेलोनी सरकारने आर्थिक क्षेत्रात मोठ्या सुधारणा केल्या नाहीत, त्यामुळे नवीन रोजगार उपलब्ध झाले नाहीत, असे ते म्हणाले. Eurostat च्या आकडेवारीनुसार, 15 ते 24 वयोगटातील रोजगार निर्देशांक हा संपूर्ण युरोपमध्ये इटलीतच सर्वात कमी आहे. बँक ऑफ इटलीनुसार, जर्मनीत एक तरुण पदवीधर बऱ्यापैकी आयुष्य जगतो. पण इटलीत याच वयोगटातील पदवीधर नोकरीच्या विंवचनेत आहे. तर त्याची कमाईही सुद्धा जर्मनीतील कमाईच्या तुलनेत 20 टक्के कमी आहे. आता राहिला प्रश्न तिथले तरुण रस्त्यावर उतरणार आहेत का? आंदोलन करणार आहेत का? याचे उत्तर भविष्यात कळेल.

Follow Us
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!