उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी आंदोलन, आंदोलनकर्त्यांची रात्री पार्टी? जाणून घ्या प्रकरण नेमकं काय

| Updated on: Feb 14, 2021 | 10:29 PM

कल्याणमध्ये उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 'मी कल्याणकर' संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन सुरु आहे (Kalyan protesters video viral who protest for Ulhas River cleaning).

उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी आंदोलन, आंदोलनकर्त्यांची रात्री पार्टी? जाणून घ्या प्रकरण नेमकं काय
Follow us on

ठाणे : कल्याणमध्ये उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन सुरु आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर हे नदीपात्रात आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र या आंदोलन दरम्यान रात्रीच्या वेळी पोपटी पार्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्टीची व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आंदोलनकर्ता पोपटी शिजविताना दिसत आहे. त्यामुळे हे आंदोलन आहे की पिकनीक पार्टी? असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे (Kalyan protesters video viral who protest for Ulhas River cleaning).

आम्ही या प्रकरणी आंदोलनकर्ते नितीन निकम यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी “मटन-चिकन खाणं हा विषयच होऊ शकत नाही. हे उपोषण नाही, तर धरणे आंदोलन आहे. आमच्या आंदोलनाला मोहने ग्रामस्थांची चांगली साथ मिळत आहे. त्यांच्याकडून आम्हाला जेवण दिले जात आहे. शाकाहारी भाजी दिली जात आहे. मी नॉनवेज खात नाही. त्यांनी जेवण-वीजेची सोय केली आहे. काही मंडळी या आंदोलनावर टीका करत असतील. त्यांना ती करु द्या. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. उल्हास नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त व्हावी हेच आमचे लक्ष्य आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरु

उल्हास नदीची स्वच्छता करण्यात यावी, या मागणीसाठी नितीन निकम यांच्यासह कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांच गेल्या पाच दिवसांपासून नदीपात्रात आंदोलन सुरु आहे (Kalyan protesters video viral who protest for Ulhas River cleaning).

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कर्जतपासून कल्याण मोहने बंधाऱ्यापर्यंत प्रदूषित आहे. या नदीच्या पात्रात सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषित झाल्याने सांडपाण्यामुळे नदीच्या पात्रात जलपर्णी साचली आहे. ही जलपर्णी पाणी शोषते. या पाण्याला घाण वास येतो.

आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी शुक्रवारी (12 फेब्रुवारी) उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोनवरुन संपर्क साधला. लवकर तोडगा निघणार असे आश्वासन आंदोलन करणाऱ्यांना दिला.

“आंदोलन करणाऱ्यांची प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. दखल न घेतल्यास राष्ट्रवादी रस्त्यावरुन उतरुन आंदोलनास तीव्र स्वरुप दिले जाईल. या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संबंधित बातम्या :

आधी राज ठाकरेंच्या शब्दाखातर आंदोलन सोडलं, नदीच्या स्वच्छतेसाठी कल्याणकराचं पुन्हा आंदोलनाचं हत्यार

…तर आम्ही थेट रस्त्यावर उतरु, उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक