कौमार्य चाचणी : बाभळीची काठी एका घावात मोडली की घटस्फोट, अघोरी पद्धत नेमकी काय?

| Updated on: Apr 13, 2021 | 1:37 PM

Kanjarbhat caste virginity test : कंजारभाट समाजातील दोन तरुणींची (Kanjarbhat caste virginity test) कौमार्य चाचणी करण्यात आली.

कौमार्य चाचणी : बाभळीची काठी एका घावात मोडली की घटस्फोट, अघोरी पद्धत नेमकी काय?
Kanjarbhat caste virginity test
Follow us on

कोल्हापूर : काही दिवसापूर्वी पुरोगामी कोल्हापूरमध्ये कौमार्य चाचणीसारखा  (virginity test) क्रूर प्रकार समोर आला. कंजारभाट समाजातील दोन तरुणींची (Kanjarbhat caste virginity test) कौमार्य चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्या फेल झाल्याने, त्यांना नवऱ्यांनी लगेचच सोडलं. म्हणजेच लग्न मोडलं. कोल्हापूरच्या या दोन तरुणींचा विवाह बेळगावातील दोन सख्ख्या भावांसोबत झाला होता. मात्र या विवाहानंतर त्यांना कौमार्य चाचणीसारख्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं. (Kanjarbhat caste virginity test what actually do? The humiliating ‘virginity tests’ for brides)

नेमकं काय घडलं?

कंजारभाट समाजात आजही अघोरी प्रकार घडतात. मुलगी ‘कोरी’ आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिची कौमार्य चाचणी घेतली जाते. जर ही चाचणी फेल ठरली की जातपंचायत भरते आणि लग्न मोडलं जातं.

कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा (Kanjarbhat caste virginity test) विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावांशी झाला होता. विवाह थाटामाटात झाला पण त्यानंतर विवाहाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य चाचणी केल्याच उघड झालंय. बेळगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं 8 एप्रिलच्या सुमारास उघड झालं.

नवरदेव सैन्यदलात

या धक्कादायक प्रकाराने कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाणे गाठलं. अखेर दोन्ही नवरदेवांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे यापैकी एक नवरदेव हा भारतीय सैन्य दलात असून, त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या दोन्ही तरुणी सध्या कोल्हापूरमध्येच वास्तव्याला आहेत. आम्ही तुम्हाला नांदवणार नाही असं जात पंचायतीमार्फत सासरच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यामुळे कौमार्य चाचणी करणाऱ्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

फांदी तुटली आणि लग्न मोडलं!

कंजारभाट समाजात अत्यंत अघोरी प्रकार आहे. जर मुलगी कौमार्य चाचणीत नापास ठरली तर तिच्या चारित्र्यावर ठपका ठेवून तिला बेदखल केलं जातं. लग्न मोडून एकप्रकारे बेइज्जत केलं जातं. जात पंचायत भरवली जाते, या पंचांसमोर पुन्हा मुलीचं चारित्र्यहनन होतं. बाभळीच्या झाडाची एक काठी घेऊन, ती एका घावात मोडली जाते. ती काठी तुटली म्हणजे लग्न मोडलं असं अधिकृत मानलं जातं. म्हणजे नवदाम्पत्याचा घटस्फोट होतो.

काय आहे कंजारभाट समाजातील काडीमोड प्रथा?

समाजातील विवाहित जोडप्याचा वाद मिटवण्यासाठी जात पंचायत भरवली जाते. यासाठी एखाद्या मंदिराचा परिसर ठरलेला असतो. यामध्ये दोन्ही बाजूने पंच आणि प्रमुख नातेवाईक यांचा समावेश असतो. पंचांसमोर नवरा-बायको आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकमेकांबद्दल असलेल्या तक्रारी सांगायच्या असतात. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दोघांनाही एकमेकांच्या चुका पंचाकडून सांगितल्या जातात.

दोघांनी या चुका मान्य करून माफी मागितली तर त्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा सुरू होतं. मात्र दोघांपैकी एकाने जरी चूक मान्य केली नाही तरी त्यांचा काडीमोड केला जातो. यामध्ये बाभळीच्या झाडाची छोटी काटी पंच हाताने मोडतात. काडी मोडल्यानंतर पती-पत्नीचा घटस्पोट झाला असं समजलं जातं

संबंधित बातम्या 

फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नवविवाहिता नापास, वरबंधूंनी लग्न मोडलं! 

पुण्यात पुन्हा 2 नववधूंची कौमार्य चाचणी, मुलाचे वडील कोर्टातील निवृत्त अधीक्षक