माझा नवरा धनंजय मुंडेही भोंदूबाबा खरातच्या संपर्कात असू शकतो, कारण त्यांनी आमच्यावरही… करुणा मुंडे यांचा खळबळजनक दाव्याने सर्वच हादरले

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यादरम्यानच आता करुणा मुंडे यांच्याकडून खळबळजनक खुलासा करण्यात आलाय.

माझा नवरा धनंजय मुंडेही भोंदूबाबा खरातच्या संपर्कात असू शकतो, कारण त्यांनी आमच्यावरही... करुणा मुंडे यांचा खळबळजनक दाव्याने सर्वच हादरले
Karuna Munde
| Updated on: Mar 20, 2026 | 11:55 AM

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली. हे प्रकरण इतके जास्त तापले आहे की, थेट रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर थेट रुपाली चाकणकर या फरार झाल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली. या प्रकरणामध्ये आता करुणा मुंडे यांनी मोठा दावा केला. करुणा मुंडे यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर आता तोंड लपून फिरत आहे, रुपाली चाकणकरने आता राजीनामा द्यायला पाहिजे. पर्दाफाश झालाय. रुपाली चाकणकरचा राजीनामा घ्यायला पाहिजे, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मी सोमवारपर्यंत वाट पाहणार आहे त्यानंतर मी मुंबईच्या सीपींची भेट घेणार आणि मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसणार.

पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी म्हटले की, भोंदूबाबा खरात सोबत बऱ्याचशा राजकीय लोकांचे संपर्क होते. दोन्ही एनसीपीचे नेते त्याच्या संपर्कात होते. मला तर वाटतं माझ्या नवरा धनंजय मुंडे हा सुद्धा त्याच्या संपर्कात असू शकतो. कारण त्याने आमच्यावर सुद्धा बऱ्याच काळ्या जादू  केल्या आहेत. एक शर्मा नावाचा कोणीतरी दुसरा पंडित आहे त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे.

रुपाली चाकणकर व्हिडिओमध्ये पाय धुताना, छत्री पकडून उभे असल्याचे दिसत आहे. त्या बाबाचे आणखीन किती महिलांसोबत संबंध होते हे देखील तपासले पाहिजे. हा लिंग पिसाट बाबा होता आणि सगळ्यांच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. हेच नाही तर त्या बाबाच्या संपर्रात कोण कोण होते, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे पण ती होत नाहीये सरकार कुणाला वाचवते हा आमच्या सवाल, असल्याचेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. याप्रकरणात सुषमा अंधारे यांनी देखील काही गंभीर आरोप केली आहेत. या प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे.

Follow Us