केडीएमसीत कचऱ्याचा प्रश्न पेटला, गन पॉईंटवर ठेवून काम करता येणार नाही, राजू पाटलांची अधिकाऱ्यांना ताकीद

| Updated on: Feb 26, 2021 | 11:53 AM

सोसायटीतील कचरा पाच दिवस महापालिकेने उचलला नाही (KDMC Garbage Collection Issue) म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी नागरिकांसह थेट पालिका अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं.

केडीएमसीत कचऱ्याचा प्रश्न पेटला, गन पॉईंटवर ठेवून काम करता येणार नाही, राजू पाटलांची अधिकाऱ्यांना ताकीद
KDMC Garbage Collection Issue
Follow us on

कल्याण-डोंबिवली : सोसायटीतील कचरा पाच दिवस महापालिकेने उचलला नाही (KDMC Garbage Collection Issue) म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी नागरिकांसह थेट पालिका अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं. त्यांना भेटून लवकरात लवकर ही समस्या सोडवा, अशी मागणी केली. पण, गन पॉईंटवर ठेवून काम करता येणार नाही, अशी ताकीदच राजू पाटलांनी पालिका अधिकार्‍यांना दिलीये (KDMC Garbage Collection Issue).

नेमकं प्रकरण काय?

कचऱ्याची विल्हेवाट बड्या सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच लावावी, असे सांगत पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील बड्या संकुलांचा कचरा उचलणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसापासून डोंबिवलीतील बालाजी सोसायटीत पालिकेची घंटागाडी न आल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका आहेत. त्यात 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही.

कचरा उचलला न गेल्याने आवारात दुर्गंधी पसरली आहे. तसेच, ते पालिकेच्या सूचनांनुसार आम्ही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन देत असतात. मात्र, सहकार्य करण्यास पालिका टाळाटाळ करत असल्यामुळे रहिवाशांनी आमदार राजू पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे समस्या मांडली. गुरुवारी आमदार राजू पाटील यांनी रहिवाशांसह पालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेतली.

यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या समोर नागरीकांनी आपली समस्या मांडली. तसेच, कचरा उचलला नाही, तर पालिकेत येऊन कचरा टाकणार, असाच इशाराच पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

नागरिकांना जबरदस्ती न करता कचरा वर्गीकरणात मदत करा, ते पण सहकार्य करतील. नागरिकांना गन पॉईंट ठेवून काम होणार नाही, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

KDMC Garbage Collection Issue

संबंधित बातम्या :

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची महिलेशी हुज्जत, राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन चोपलं

‘कोरोनाला नंतर बघू, आधी लॉकडाऊनचा बंदोबस्त करु’, डी मार्टबाहेर खरेदीदारांची त्सुनामी

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या भामट्याला अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई