AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाइक, हुडी अन्…; केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलिसांना काय-काय पुरावे सापडले?

ketan agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणात लोणावळा पोलिसांनी आरोपींची बाईक, हुडी आणि हेडफोन जप्त केले आहेत.

बाइक, हुडी अन्...; केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलिसांना काय-काय पुरावे सापडले?
| Updated on: Jun 28, 2026 | 8:44 AM
Share

केतन अग्रवाल हत्याकांडाने महाराष्ट्रासहित देश हादरला आहे. या हत्याकांडाची संपूर्ण देशभर चर्चा होत आहे. पोलिसांकडूनही याप्रकरणी आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. देशाचं लक्ष लागलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. पुण्याच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या हत्याकांडाशी संबंधित अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी चेतन चौधरीची बाइक देखील जप्त केली आहे. याच बाइकने चेतन चौधरी लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता, पोलिसांनी आरोपींकडून हुडी, हेडफोन जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

पुण्यातील २६ वर्षीय रिअल एस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी 18 जून रोजी लोहगडावर ज्या बाइकने आला होता. ती बाइक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. बाइकसोबत त्याच्याजवळील हुडी आणि हेडफोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बाइक आणि कपड्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. या तपासणीमुळे या प्रकरणातील आणखी भक्कम पुरावे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यात राहणारा केतन अग्रवाल हा होणारी बायको सिया गोयलसोबत लोहगड किल्ल्यावर आला होता. याच किल्ल्यावर आरोपींनी कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. सियाने हळूच खाली बसलेल्या चेतनला इशारा दिला. त्यानंतर पाठीमागून आलेल्या चेतनने किल्ल्याच्या कडेला बसलेल्या केतनला धक्का दिल्याचा आरोप आहे. या घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला.

सुरुवातीला केतनचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु पोलिसांच्या चौकशीच दोघांनी कट रचून केतनची हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी आता फॉरेन्सिक अहवाल, इलेक्ट्रॉनिक पुरावे, घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आता पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. या फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?