Ketan Agarwal Murder : केतनच्या पाठीवर सियाचा टॅटू, आणि त्याच्या फोनमध्ये… बहिणीने काय काय सांगितलं ?

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात 3 महिन्यांनंतर नवे खुलासे झाले आहेत. चार्जशीटनुसार, केतनच्या पाठीवर 'सिया' नावाचा टॅटू होता, जो त्याच्या बहिणीने सियाला दाखवला. लोहगडावर सियाने केतनला धक्का दिला होता, असा दावाही संजना अग्रवालने केला आहे.

Ketan Agarwal Murder : केतनच्या पाठीवर सियाचा टॅटू, आणि त्याच्या फोनमध्ये... बहिणीने काय काय सांगितलं ?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 2:54 PM

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला (Ketan Aegarwal Death) 3 महिने उलटून गेले असून केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सिया आणि तिच्या कुटुंबियांबद्दल अनेक दावे केले. माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करा, असं आवाहनही केलं. आता याप्रकरणात एक नवा, मोठा खुलासा झाला आहे. केतन अग्रवाल याने त्याच्या पाठीवर, त्याची होणारी पत्नी सिया हिच्या नावाचा टॅटू काढून घेतला होता. केतनच्या बहिणीने त्या टॅटूचा फोटो सियाला व्हिडीओ कॉलद्वारे दाखवला होता. केतनची बहीण संजना अग्रवाल हिच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे. लोहगड किल्ल्यावर केतनच्या झालेल्या मृत्यूप्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्यामध्येच संजना अग्रवाल हिचा जबाब आणि केतनची होणरी पत्नी सिया यांच्याचील संबंधांशी निगडीत अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. संजनाच्या जबाबानुसार, केतनने त्याच्या पाठीवर सियाच्या नावाचा ‘Siya’ असा टॅटू गोंदवून घेतला होता. सियाला सरप्राईज देण्यासाठी त्याने टॅटू काढला होता.  केतनच्या मृत्यूनंतर त्याचा मोबाईल तपासताना संजनाला त्याच्या पाठीवर हा टॅटू असलेला फोटो मिळाला. हा फोटो सियाला दाखवण्याचा तिने प्रयत्न केला होता.

18 जूनला केतनचा लोहगडावरून पडून मृत्यू झाला. त्यानंतर 19 जून 2026 रोजी सिया तिच्या आई-वडिलांसह आणि इतर नातेवाईकांसोबत केतनच्या कुटुंबीयांच्या घरी आली होती. त्यावेळी संजनाला तिला हा फोटो दाखवायचा होता; मात्र तेव्हा तिला तो दाखवता आला नाही. त्यानंतर सिया घरी गेल्यावर संध्याकाळी सुमारे 7:30 वाजता सियाने संजनाला व्हॉट्सॲपवर मेसेज केला.

Loading...

केतनने माझ्यासाठी काय गिफ्ट दिलं होतं ?

त्यावेळी सियाने संजनाला मेसेज केला आणि ‘केतनने माझ्यासाठी काय गिफ्ट दिलं होतं ?’असा सवाल तिला विचारला, असं चार्जशीटमधील जबाबात नमूद करण्यात आलं आहे. मी मोकळी झाले की तुला कॉल करते, असं संजनाने तिला सांगितलं. त्यानंतर रात्री साधारण 10 च्या सुमापास संजनाने सियाला व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल केला. यावेळी तिने केतनच्या मोबाईलमध्ये सापडलेला फोटो सियाला दाखवला. या फोटोमध्ये केतनच्या पाठीवर ‘Siya’च्या नावाचा टॅटू होता. तो फोटो दाखवल्यावर संजनाने व्हिडीओ कॉल कट केला.

आमचा प्रोफाईल फोटो बदल, सियाची विनंती

या चार्जशीटमधील संजनाच्या जबाबानुसार, 20 जूनला दपारी 1:20 च्या सुमारास सियाने तिला मोबाईलवर एक मेसेज केला. केतनच्या प्रोाफील पिक्चरवर तिचा आणि केतनचा फोटो होता, तो फोटो बदल आणि दुसरा फोटो लाव, असं सियाने तिला सांगितलं. ‘केतनच्या प्रोफाइल पिक्चरमधून आपला फोटो काढून टाक, नाहीतर तो न्यूजवाल्यांच्या हाती लागेल,’ असा मेसेज सियाने केला, असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

संजनाच्या जबाबानुसार, केतनसियाचं लग्न ठरल्यावर दोघं सतत एकमेकांच्या संपर्कात होते. 11 फेब्रुवारी 2026 ला नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा पाहण्याचा कार्यक्रम ठरला आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत 19 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एका हॉटेलमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर सियाने केतनच्या मोबाईलमध्ये तिच्या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटही सुरू केलं, अशी माहिती समोर आली आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, केतन आणि सिया दर रविवारी भेटत असत तसेच फोनवरूनही नियमित बोलत असत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दोघांच्या बाली येथे प्री-वेडिंग शूटची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी केतनने हॉटेल, विमानाची तिकिटे आणि फोटोग्राफरची बुकिंग केल्याचेही आरोपपत्रात नमूद केलं आहे.

14 जूनच्या लोहगड भेटीबाबत केतनने काय सांगितलं ?

आरोपपत्रातील संजनाच्या जबाबानुसार, 14 जून रोजी लोहगडवरून परतल्यानंतर केतनने तिला एक घटना सांगितली होती. त्याच्या म्हणण्यानुसार, सियाने लोहगड किल्ल्यावर अचानक त्याला धक्का दिला होता. सियाने ‘साप-साप’ असं ओरडत मला धक्का दिला, असं केतनने सांगितल्याचा दावा संजनाने केला. मात्र त्यावेळी केतनने स्वतःला वेळीच सावरले; अन्यथा तो दरीत पडू शकला असता, असंही त्याने सांगितल्याचं जबाबात नमूद करण्यात आलं आहे.

ही घटना घरातील इतर सदस्यांना सांगू नकोस अशी विनंती केतनने संजनाला केल्याचेही आरोपपत्रात म्हटलं आहे. सियाला लोहगडावर फिरायला आवडतं आणि ती वारंवार त्याला तिथे जाण्यास सांगते, असे केतनने सांगितल्याचा दावा संजनाने केला. ही घटना आई-वडिलांना समजल्यास ते त्याला सियासोबत पुन्हा लोहगडला जाऊ देणार नाहीत, अशी भीती केतनला होती, असंही तिच्या जबाबात नमूद आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us