AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS Divya Mittal : IAS अधिकाऱ्याला त्याचा राजीनामा मागे घेता येतो, पण दिव्या मित्तल यांना अशी सवलत का मिळणार नाही?

IAS Divya Mittal Resignation : IAS दिव्या मित्तल यांच्या बाबतीत राजीनामा मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्यांनी राजीनामा देताना राजकारणात प्रवेश करणार असल्याचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यामुळे त्यांच्या माघारीचा प्रश्नच येत नाही.

IAS Divya Mittal : IAS अधिकाऱ्याला त्याचा राजीनामा मागे घेता येतो, पण दिव्या मित्तल यांना अशी सवलत का मिळणार नाही?
IAS Divya Mittal
| Updated on: Sep 29, 2026 | 3:21 PM
Share

मागच्या काही दिवसांपासून IAS दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे. IAS दिव्या मित्तल पुढे काय करणार? हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर आता मिळालं आहे. IAS पदावरुन राजीनामा दिल्यानंतर दिव्या मित्तल यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी राजीनामा दिल्याची पुष्टि केली. “मला वंचितांचं आवाज बनायचं आहे. राजकारण बदलायचं आहे. कुठल्यापक्षासोबत नाही, तर इराद्याचं राजकारण करायचं आहे” असं दिव्या मित्तल म्हणाल्या. कुठल्याही IAS च्या राजीनाम्यासाठी पहिली अट हिच असते की, तो कुठल्याही अटी-शर्तीशिवाय असावा. राजीनामा देताना त्यात कारण स्पष्टपणे नमूद असलं पाहिजे. IAS जिथे तैनात असतो, तिथून राजीनाम्याची प्रोसेस सुरु होते. IAS अधिकारी त्याचा राजीनामा सर्वप्रथम चीफ सेक्रेटरीला पाठवतो.

IAS राज्याच्या प्रधान सचिवाला त्याचा राजीनामा पाठवतो. पण म्हणून तो लगेच 100 टक्के मंजूर होणार याची खात्री नसते. दोन्ही अधिकारी आपल्या मर्जीने हे ठरवू शकत नाही. त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळवणं आवश्यक असतं. IAS अधिकाऱ्याचा राजीनामा,विजिलेंस स्टेटस आणि त्याचा ड्यू रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवणं हे राज्य सरकारचं काम आहे. ज्या प्रमाणे IPS च्या राजीनामा गृहमंत्रालयाकडून मंजूर होतो, IFS च्या राजीनाम्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळते, त्याचप्रमाणे IAS अधिकाऱ्याच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम DOPT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगचं असतं.

राजीनामा मागे घेता येतो का?

एकदा IAS किंवा IPS ने राजीनामा दिला की, ते पुन्हा मागे घेऊ शकत नाहीत असं अजिबात नाहीय. त्यासाठी सुद्धा नियम आहे. जर, त्यांना राजीनामा मागे घ्यायचा असेल तर 90 दिवसांचा वेळ असतो. तितक्या कालावधीत ते राजीनामा मागे घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना लिखित अर्ज करावा लागतो. काही प्रकरणात राजीनामा मागे घेणं शक्य नसतं. ऑल इंडिया सर्विस रूल्स नुसार राजीनाम्या मागचा हेतू सुद्धा महत्वाचा असतो. एखाद्या अधिकाऱ्याने निवडणूक लढवण्याच्या किंवा राजकीय पक्षात प्रवेशाच्या उद्देशाने राजीनामा दिला, तर त्याला राजीनामा मागे घेण्याचा अधिकार नसतो. प्रोसेसनुसार राजीनामा मंजूर झाला तर तो मागे घेता येत नाही. जो पर्यंत राजीनामा मंजूर होत नाही, तो पर्यंत मागे घेण्याची संधी असते.

Follow Us
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण