Ketan Agarwal Murder : सियाचा बॉयफ्रेंडबरोबर आधीच हनिमून? केतन हत्या प्रकरणातील भयंकर सत्य समोर; मोठा गौप्यस्फोट

केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सियाने तिचा प्रियकर चेतनसोबत केतनची हत्या केली. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दावा केला आहे की, सियाचे चेतनसोबत लग्नाआधीच अफेयर होते आणि ते दोघे हनिमूनलाही गेले होते. सियाच्या कुटुंबाला या भानगडी माहीत असूनही त्यांनी हे लग्न लावून दिले.

Ketan Agarwal Murder : सियाचा बॉयफ्रेंडबरोबर आधीच हनिमून? केतन हत्या प्रकरणातील भयंकर सत्य समोर; मोठा गौप्यस्फोट
केतन अग्रवाल हत्या प्रकरण
| Updated on: Jun 23, 2026 | 9:25 PM

केतन अग्रवाल प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी सिया हिनेच केतनचा खून केल्याचं समोर आलं आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही या कटात सहभागी होता. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. या दोघांचा कसून तपास केला जात असून आणखी माहिती शोधण्यात येत आहे. पण त्यापूर्वीच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. सियाचं चेतन नावाच्या तरुणासोबत अफेयर होतं आणि त्यांचा हनिमूनही झाला होता, असा दावा केतनच्या वडिलांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विशाल अग्रवाल अग्रवाल यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पुणे SP (ग्रामीण) संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणाचा चांगला तपास केल्याचं विशाल अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. तसेच नोव्हेंबरपासूनच सियाचं चेतन बाबूलाल चौधरीसोबत अफेयर होतं. त्यांनी हनिमूनही केला होता. ते दोघे बाहेर फिरायलाही गेले होते, असा खळबळजनक दावा विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

लोहगडावर सोबतच

घटना घडली त्या दिवशी चेतन हा सिया आणि केतनच्या आसपासच होता. लोहगड किल्ल्यावर तो या दोघांच्या 20 फूट अंतरावर होता. दोघांनी संगनमताने केतनला मारून फेकून दिलं, असंही विशाल अग्रवाल यांनी सांगितलं.

तिच्या अनेक भानगडी

हे अरेंज मॅरेज होते. दोन्ही कुटुंबाच्या संमती लग्न ठरलं होतं. त्यावेळी सियाच्या अफेयर्सचं माहीत नव्हतं. त्या मुलीच्या ज्या भानगडी आहेत, त्या माहीत नव्हत्या. तिच्या एकच नाही, तर अनेक भानगडी असाव्यात. तिच्या कुटुंबाला तिच्या सर्व भानगडी माहीत होत्या. तरीही त्यांनी आम्हाला फसवलं. त्यांना वाटलं मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या भानगडी थांबतील. म्हणून त्यांनी लग्न लावून देण्याची घाई केली असावी, असंही ते म्हणाले.

एखादी मुलगी कशी ठऱवू शकते?

आम्ही दोन्ही कुटुंब एकमेकांना 35-40 वर्षापासून ओळखतो. त्यामुळेच हे अरेंज मॅरेज ठरलं होतं. या कटामागे त्यांच्या कुटुंबातील काही लोकांचा हात आहे का? हे तपासायला पोलिसांना सांगितलं आहे. एखाद्या मुलाला मारलं पाहिजे हे 20 वर्षाची मुलगी कशी ठरवू शकेल? तिचे आईवडील, भाऊ, आत्या आणि इतर कुणी या कटात असू शकतात. त्या दिशेनेही तपास व्हावा अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us