
विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होणार आहेत. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानला जातो. या गडाला कायम राखण्यात पक्षाची फाळणी झाल्यानंतर शरद पवार यांना यश येते का ? हे पाहावे लागणार आहे. कोल्हापूरातील राधानगरी मतदार संघाचे बोलायचे झाले तर येथील विद्यमान आमदार शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत या मतदार संघावर उद्धव ठाकरे क्लेम करणार हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे हा मतदार संघ महाविकास आघाडीत नेमका कोणाकडे जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साल 2008 नुसार झालेल्या मतदारसंघांच्या फेरचनेनुसार राधानगरी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड हे दोन तालुके आणि आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळाचा...