VIDEO | कोल्हापुरातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड, अनेक गावांना धोका

| Updated on: Jul 26, 2021 | 11:33 AM

निकृष्ट कामाच्या दर्जामुळे वासनोली धरण हे बहुचर्चित आहे. त्यातच आता सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

VIDEO | कोल्हापुरातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड, अनेक गावांना धोका
Vasnoli dam kolhapur
Follow us on

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. भुदरगड तालुक्यातील पावसामुळे अनेक प्रमुख मार्गांसह दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Kolhapur Vasnoli dam wall broken)

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट कामाच्या दर्जामुळे वासनोली धरण हे बहुचर्चित आहे. त्यातच आता सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोल्हापुरात मुसळधार

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात जनजीवन ठप्प झाले आहे. कोल्हापुरातील नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही घरातही पाणी शिरले आहे. भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव, उत्तूर, गडहिंग्लज या ठिकाणची वाहतूक बंद पडली आहे. या मार्गावरची वाहतुक कापशी मार्गे वळविण्यात आली.

पाहा व्हिडीओ :

(Kolhapur Vasnoli dam wall broken)

संबंधित बातम्या :

पूरग्रस्तांसाठी वर्सोवा मनसे सरसावली; कोकण, महाड, चिपळूणकडे कपडे, खाण्याची सामग्री रवाना

राज्यात पुराचं संकट, यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत