Parth Pawar : पार्थ पवारांवर जमीन घोट्याळ्याचे आरोप, पहिला मोठा दणका, सर्वात मोठी बातमी समोर

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे, यामुळे आता पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Parth Pawar : पार्थ पवारांवर जमीन घोट्याळ्याचे आरोप, पहिला मोठा दणका, सर्वात मोठी बातमी समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 3:25 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पार्थ पवार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत, तर दुसरीकडे या संदर्भात अजित पवार यांनी देखील माध्यमांशी बोलणं टाळलं आहे, या संदर्भात प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ते पक्षाच्या बैठकीला निघून गेले. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप होत आहे, तसेच मुद्रांक शुल्क म्हणून फक्त 500 रुपये दिल्याचा आरोपही होत आहे. दरम्यान यावरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केल्याचं पहायला मिळत आहे.

या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या प्रकरणात आता पहिली कारवाई करण्यात आली आहे.पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याच्या 40 एकर जागेचा बेकायदा व्यवहार करण्यात आला, मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करण्यात आली, ही जमीन पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने खरेदी केली अशी माहिती मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बेकायदेशी असल्याचा ठपका ठेवत या प्रकरणात पुण्याचे दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुद्रक शुल्क विभागानं या प्रकरणात ही मोठी कारवाई केली आहे.

अजित पवारांनी बोलणं टाळलं

दरम्यान अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप होत आहे, तसेच 300 कोटींच्या व्यवहारांमध्ये अवघ्या 500 रुपयांचा स्टॅप लावण्यात आल्याचा आरोपही होत आहे. या संदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी या प्रकरणावर बोलणं टाळलं आहे, कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

दरम्यान यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, जे आरोप होत आहेत, त्यासंदर्भात मी सर्वा माहिती मागवली आहे.  या संदर्भात चौकशीचे आदेश मी दिले आहेत, माहिती मिळाल्यानंतर मी या प्रकरणावर बोलेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.