AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : अजित पवारांच्या मुलाला 1800 कोटीची जमीन 300 कोटीला, या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाविषयी प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं?.

Devendra Fadnavis : अजित पवारांच्या मुलाला 1800 कोटीची जमीन 300 कोटीला, या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis -Parth Pawar
| Updated on: Nov 06, 2025 | 12:19 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. 1800 कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. मुद्रांक शुल्क म्हणून फक्त 500 रुपये दिले असा आरोप उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ” या प्रकरणासंदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्डस असतील या संदर्भातील सगळी माहिती मी मागवली आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत. सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे, त्या आधारावर जे काय तुम्हाला सांगायच ते मी सांगणार आहे. अजून संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. प्राथमिक दृष्ट्‍या जे मुद्दे समोर येतायत ते गंभीर आहेत. या प्रकरणी माहिती घेऊनच बोलणार आहे. आज सगळी माहिती माझ्याकडे येईल. त्यानंतर शासनाची पुढची दिशा काय असेल? काय कारवाई करणार ते सांगू” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भ्रष्टाचाराचे आरोप करुन सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे का? त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “या संदर्भात उपमुख्यमंत्री अशा कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालतील असं मला अजिबात वाटत नाही. या संदर्भात सरकारच एकमत आहे, कुठलीही अनियमितता झाली असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. अनियमितता झाली आहे की, नाही हे पडताळून पाहिलं जाईल. अनियमितता आढळली तर कठोर कारवाई होईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘लोकांना पकडून, पकडून आणलं जातय’

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना शेतकरी जेव्हा संकटात होता, तेव्हा ते कार्पेटवरुन खाली उतरले नव्हते” “किमान सततच्या पराभवानंतर त्यांच्या लक्षात आलय की, लोकांमध्ये जावं लागतं. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. कारण त्यांना माहितीय की, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे आलेले आहेत. लोकांना पकडून, पकडून आणलं जातय. सरकारचं पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचतय. आरबीआयच्या नियमानुसार दररोज 600 कोटी रुपये द्यावे लागतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.