पुणे तिथे काय उणे! मागील वर्षी मृत्यू झालेल्या गव्याला श्रद्धांजली, कोथरुडमध्ये प्रायश्चित सभेचे बॅनर

मागील वर्षी पुण्यात भरकटलेल्या गव्याचा मृत्यू झाला होता. या गव्याला श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर कोथरुडमध्ये झळकले आहेत. या गव्याला श्रद्धांजली अर्पण करतानाच कोथरुडकरांनी 9 तारखेला प्रायश्चित सभाही आयोजित केली आहे. कोथरुडमधील चौकात श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. गव्याला वाहण्यात आलेल्या या बॅनरची आज पुण्यात सगळीकडे चर्चा आहे.

पुणे तिथे काय उणे! मागील वर्षी मृत्यू झालेल्या गव्याला श्रद्धांजली, कोथरुडमध्ये प्रायश्चित सभेचे बॅनर
मागील वर्षी मृत्यू पावलेल्या रानगव्याला पुणेकरांची श्रद्धांजली

पुणे : जंगलातून वाट चुकून माणसांच्या सिमेंटच्या जंगलात आलेल्या एका जखमी रानगव्याचा (Rangava) पुणेकरांच्या हुल्लडबाजीनं जीव घेतला होता. 700 ते 800 किलो वजनाचा हा गवा अंदाजे 3 ते 4 वर्षाचा होता. नैसर्गिक अधिवास संपत आल्यानं मानवी वस्तीत आलेल्या या वन्यप्राण्यांना सहानुभूतीने वागणूक देण्याची आवश्यकता असते. पण हुल्लडबाडी करणाऱ्या अतिउत्साही नागरिकांमुळे या रानगव्याला जीव गमवावा लागला होता. मागील वर्षी मृत्यू झालेल्या गव्याला पुणेकरांनी श्रद्धांजली अर्पण केली!

मागील वर्षी पुण्यात भरकटलेल्या गव्याचा मृत्यू झाला होता. या गव्याला श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर कोथरुडमध्ये झळकले आहेत. या गव्याला श्रद्धांजली अर्पण करतानाच कोथरुडकरांनी 9 तारखेला प्रायश्चित सभाही आयोजित केली आहे. कोथरुडमधील चौकात श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. गव्याला वाहण्यात आलेल्या या बॅनरची आज पुण्यात सगळीकडे चर्चा आहे.

नेमकं काय घडलं होतं?

9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी आठच्या सुमारास जखमी रानगवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात आला. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी हा विचित्र प्राणी पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याची माहिती पुणेकरांना कळताच पुणेकरांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. या गव्याची दिवसभर धरपकड सुरू होती. त्यामुळे लोकांची गर्दी वाढल्याने हा रानगवा बिथरला. त्यातच वनखाते आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे तो आणखीनच बिथरला. त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्धही केले. पण बिथरलेल्या या गव्याचा अखेर मृत्यू झाला होता.

स्त्यावर रक्ताचा सडा

नागरिकांनी गर्दी करून गोंगाट केल्याने हा जखमी गवा अधिकच बिथरला. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. तशा अवस्थेत तो सैरभर पळत राहिला. महात्मा सोसाटीतून हा गवा पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उजव्या भुसारी कॉलनीतील इंदिरा-शंकर सोसायटीत आला. या सोसायटीच्या पार्किंग शेजारी हा गवा बसून राहिला. पण जमाव जमा झाल्याने त्याने पार्किंगमधील कारला शिंगांनी धडका दिल्या. या गव्याने कारचा टायर पंक्चर केला. गव्याने धडक दिल्याने या कारचं मोठं नुकसान झालं होतं.

ट्रँग्युलाईज केलं नसतं तर?

अत्यंत शक्तीशाली असलेल्या या गव्याला पकडण्यासाठी त्याला ट्रँग्युलाईज करण्यात आले. त्यानंतर त्याला बेशुद्ध केल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या गव्याला ट्रँग्युलाईज केलं नसतं तर मोठा अनर्थ घडू शकला असता, असं वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या : 

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, लॉकडाऊन लागणार का? काय खबरदारी घ्यावी, टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

Pakistan : श्रीलंकन नागरिकाची जमावाकडून हत्या, लिंचिंग प्रकरणात 800 लोकांविरोधात दहशतवादाचा गुन्हा, 13 संशयित अटकेत

Published On - 11:45 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI