Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तिंघाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आता संगिता चांदगुडे यांचं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्..., कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
संगीता चांदगुडे यांचे गंभीर आरोप
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 8:33 AM

गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. चांदगुडे कुटुंबातील तिघांचा शहरातील देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. मुलगा कुणाल चांदगुडे, आई संगीता चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे अशी या प्रकरणातील मृतांची नावं आहेत. दरम्यान सुरुवातीला आयफोनचे हाफ्ते थकल्यामुळे कुणालले असं पाऊल उचलल्याचं बोललं जातं होतं. मात्र आता या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे समोर येत आहेत. यावरून या घटनेमागे कौटुंबीक वाद असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहेत. कुणालची आई संगीता यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे काही युट्यूब तसेच फेसबुक व्हिडीओ समोर आले आहेत.

काही व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या नणंदेवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर जी परिस्थिती ओढवली त्याला नणंद जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान त्यानंतर आता संगीता चांदगुडे यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपले पती मुरलधीर चांदगुडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये संगीता चांदगुडे यांनी म्हटलं आहे की, मुरलीधर म्हणायचे की, ‘माझं खूप प्रेम आहे, माझ्या बायकोवर, माझं खूप प्रेम आहे माझ्या मुलावर पण मला राग आला म्हणून मी माझ्या बायकोला मारलं, मला राग आला म्हणून मी माझ्या मुलाला मारलं. मग राग आल्यानंतर तुम्ही कधी बहिणीवर, आईवर, वडिलांवर तर कधी हात उचलत नाहीत, कोणाला शिकवता?’  असं या फेसबुक पोस्टमध्ये संगीता चांदगुडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या दोन्ही कुटुंबाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संगिता चांदगुडे यांच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांवर काही गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे संगीता यांच्यामुळेच आपला मुलगा वीस वर्ष आमच्यापासून दूर राहिल्याचा आरोप सांगिता यांच्या सासरच्या लोकांकडून करण्यात आला आहे. शुक्रवारी ही घडना घडली होती, खवड्या डोंगरावरून पडून आई, मुलगा आणि वडिलांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर आता या प्रकरणात  धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us