मुलगा, सून आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा खळबळजनक खुलासा, कुटुंबात 20..

कुणाल चांदगुडे खवड्या डोंगरावर पोहोचला. तिने तास त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. पण त्यादरम्यान तो कोणाचेही एकत नव्हता. आईने त्याला समजवण्याठी खूप जास्त प्रयत्न केले. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. आता यामध्ये मोठा खुलासा झाला.

मुलगा, सून आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा खळबळजनक खुलासा, कुटुंबात 20..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 23, 2026 | 12:23 PM

कुणाल चांदगुडे वय 19 याने खवड्या डोंगराहून उडी घेतली. कुणालने आयफोनसाठी डोंगराहून उडी मारल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतर वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. कुणाल याला वाचवण्यासाठी वडील मुरलीधर पुढे आले. त्यांनी कुणालला पकडलेही पण त्यावेळी दुर्देवी घटना घडली आणि बाप लेक क्षणात कोसळले. त्यावेळी हे बघून आईनेही उडी मारली. मुरलीधर चांदगुडे, संगीत चांदगुडे आणि कुणाल यांचा मृत्यू झाला. यादरम्यानच आता चांदगुडे कुटुंबाबद्दल अत्यंत मोठा खुलासा झाला. गेल्या सहा वर्षांपासून चांदवडे कुटुंबात मोठा कलह सुरू होता. मोठ्या मुलाचे आजारपणाने निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मुरलीधर आणि संगीता यांच्यात वाद होत होता. मुरलीधर हे ट्रकचालक असल्याने ते सतत बाहेर राहत. त्यातच कुणाल याचे वडिलांसोबत अजिबात जमत नव्हते.

या घटनेनंतर कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आईवर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आली. मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळगावी धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान मुरलीधर यांचे वडील दामोदरराव यांनी मोठा खुलासा केला. त्यांनी म्हटले की, मुरलीधर याने 20 वर्षांपूर्वी लग्न केले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये तो नोकरीच्या शोधात गेला होता.

तिथे तो ड्राईव्हर म्हणून नोकरी करत होता. त्याने संगिता नावाच्या मुलीसोबत लग्न केले. आम्हाला त्याबाबत काहीही माहिती नव्हते. त्याने लग्न केले हे पण माहिती नव्हते. आम्हाला उशिरा समजले, आम्ही त्याच्यावर नाराज होतो. तो आमच्यासोबत जास्त बोलतही नव्हता. मी माझी जमीन त्याच्या नावावर केली. तीन एकर जमीन मी मुलगा मुरलीधर याला दिली. एक तुकडाही मुलींच्या नावावर केला नाही.

पण मुरलीधर कधीच गावाकडे येत नव्हता. त्याने मी दिलेली जमीन बटईने दिली होती, असे मुरलीधर यांचे वडील दामोदरराव यांनी केला. पुढे त्यांनी म्हटले की, तो फार कमी तो बोलायचे जास्त नाहीच. मी माझी सर्व जमिन त्याच्या नावावरच केली. मुलींना एक तुकडाही दिला नाही. हे सर्व सांगताना मुरलीधर यांच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us