कुणाल याच्या आयफोनबद्दल धक्कादायक माहिती, काकाचा हैराण करणारा खुलासा, एक नाही तर थेट..

खवड्या डोंगरावरवरून एक कुटुंब संपले. मुलाला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले. मात्र, मुलगा आणि वडील एकत्रच खाली पडले. त्यानंतर आईनेही कोणाला काही कळण्याच्या आतच थेट उडी घेतली. यादरम्यान आता कुणालच्या काकांनी मोठा खुलासा केला.

कुणाल याच्या आयफोनबद्दल धक्कादायक माहिती, काकाचा हैराण करणारा खुलासा, एक नाही तर थेट..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 22, 2026 | 6:53 PM

ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील देवळाली परिसरात दुर्देवी घटना घडली. कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष थेट खवड्या डोंगरावर  पोहोचला. कुणाल जीव देण्यासाठी तिथे गेल्याचे कळताच त्याच्या आईने आणि वडिलांनी तिथे धाव घेतली. हेच नाही तर लोकही मोठ्या संख्येने समजले. प्रत्येकजण त्याला समजावत होता. आई गयावया करत होती. लेकराला वाचवण्यासाठी तिची तळमळ पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. कुणाल याला आयफोन 15 पाहिजे होता. त्यानंतर वडिलांनी पैशांची समवा समज करून त्याला हप्तावर फोन घेऊन दिला. मात्र, हप्ते फेडण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता, असे सांगितले जाते. मात्र, आता या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली. हा वाद आयफोनचा नव्हता, हे पुढे आले. कुणालच्या आयफोनबद्दल मोठी माहिती पुढे आली.

यादरम्यान कुणालच्या काकांनी मोठा खुलासा केला. कुणालचे काका म्हणाले की, त्याच्या आई वडिलांमध्ये वाद होता. त्यामुळे तो त्रस्त होता. काही दिवसांपूर्वीच वडिलांनी त्याला रागावले होते. कुणाल अभ्यासात खूप जास्त हुशार होता. आई वडिलांचे छोटे मोठे वाद सुरू होते, त्याला तो वैतागला होता. हे वाद फार काही मोठे नव्हते पण प्रत्येक घरात असतात, तसे होते. तो आई वडिलांना भीती दाखवण्यासाठी पोहोचला. पण पाय घसरला.

पुढे त्याच्या काकाने म्हटले की, कुणालचे वडील चालक होते. पण त्यांच्याकडे मोठी शेती होती. त्याच्या कितीतरी मोठ्या फिस भरल्या. त्याच्याकडे दोन आयफोन होती. त्यांच्याकडे जो कुत्रा आहे, त्याचा महिन्याला 7-8 हजार खर्च आहे. त्यांचे सर्व एकदम व्यवस्थित होते. कशामुळे हे झाले माहिती नाही. तसे काही नव्हते की, त्याने आयफोनसाठी हे केले.

घरगुती काही समस्या असल्याने ते झाले. कुणाल आणि त्याच्या आईचे खूप जास्त प्रेम होते. आई वडील जेवढे प्रेम करत होते, तोही तेवढाच जीव लावत होता. वाद छोटा वाद असतो, पण तो या टोकाला जातो. कुटुंबात वाद नाही व्हायला पाहिजे. मुलांनीही आई वडिलांची लाड कमी केली पाहिजे. कुणाल याच्या केसने मोठी खळबळ झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us